सीएसएमटी-कल्याण एसी लोकल सुरु

मुंबई : मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कल्याणदरम्यान एसी लोकल रेल्वेला हिरवा कंदील दाखविण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा एसी लोकलने प्रवास करता येणार आहे. आजपासून या मध्य रेल्वेवर सोमवार ते शनिवार रोज या एसी लोकलच्या दिवसाला 10 फेर्‍या असणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर ही लोकल धावणार आहे.

सोमवार ते शनिवार सकाळी 5.42 ते रात्री 11.25 या वेळेत एसी लोकल धावणार आहे. यात दोन सीएसएमटी ते कल्याण, चार सीएसएमटी ते डोंबिवली आणि चार सीएसएमटी ते कुर्ला अशा फेर्‍या असणार आहेत. पहिली लोकल सकाळी 5.42 ला कुर्ल्यावरून सीएसएमटीसाठी सुटेल, तर शेवटची लोकल रात्री 11.25 ला वाजता सीएसएमटीवरून कुर्ल्यासाठी सुटेल.

प्रवाशांचा प्रतिसाद बघून येणार्‍या काळात या फेर्‍या वाढवल्या जातील. सुरुवातीला जरी या लोकलला अल्प प्रतिसाद मिळाला तरी जेव्हा सामान्य नागरिकांना देखील या लोकल मध्ये प्रवासाची मुभा मिळेल तेव्हा या लोकलला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. सध्या तरी मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांनी या लोकलचे स्वागत केले आहे.