शरदचंद्र पवार यांच्या महारांगोळीचे आयोजन

नवी मुंबई : नुकताच शरदचंद्र पवार साहेब यांचा 80 वा वाढदिवस मोठा थाटामाटात संपूर्ण ठिकाणी साजरा झाला. नवी मुंबईतही या निमित्ताने 19 डिसेंबर रोजी शरदचंद्रजी पवार यांच्या महारांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. 6400 चौरस फूट ही आकर्षक महारांगोळी सानपाडा येथील गावदेवी मैदानामध्ये सुप्रसिद्ध कलाकार श्री हरी पवळे व त्यांचे विद्यार्थी साकारणार आहेत.

शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमीत्त विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे तसेच इतर सामाजिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईतही यांच्या महारांगोळीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अवकाळी पाऊस आल्यामुळे हा कार्यक्रम एक आठवडा पुढे ढकलण्यात आला. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुरस्कृत व आगरी कोळी संघर्ष समिती नवी मुंबई आयोजित ऐंशी बाय ऐंशी फुटाची महारांगोळी शनिवार दिनांक 19 डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. 6400 चौरस फूट ही आकर्षक महारांगोळी सानपाडा येथील गावदेवी मैदानामध्ये रेखाटण्यात येणार आहे.

ही महारांगोळी सुप्रसिद्ध कलाकार श्री हरी पवळे व त्यांचे विद्यार्थी साकारणार असून या भव्य रांगोळीला बघण्याकरिता नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या वेळी सोशल डिस्टंसिंगचे एम पाडण्यासाठी विशेषता सेल्फी पॉइंट सुविधा उपलब्ध केली असून या ठिकाणी ठराविक संख्येनेच नागरिकांनाच प्रवेश देण्यात येईल. याच बरोबर पूर्ण दिवस या ठिकाणी शरद पवार यांची राजकीय आत्मकथा ‘लोक माझे सांगाती’ चे सामूहिक वाचन करण्यात येईल. यामागील उद्देश हाच आहे कि येणार्‍या पिढीला साहेबांच्या संघर्षातून प्रेरणा मिळावी.  या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना रुपेश हिराजी ठाकूर ,जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी मुंबई यांनी सांगितले की आम्ही साहेबांच्या आणि 80व्या वाढदिवसाच्या दिवशी असा कार्यक्रम आयोजित करू इच्छित होतो की जेणेकरून त्यामध्ये नव्या पिढीला प्रेरणा मिळावी. कार्यक्रमाच्या दिवशी अबालवृद्ध याठिकाणी महारांगोळीला भेट देऊन व साहेबांच्या आत्मकथेचे व त्यांच्यावर आधारित पुस्तकाचे वाचन करून एक प्रेरणा घेऊनच घरी जातील. या कार्यक्रमाचे आयोजन रुपेश हिराजी ठाकूर, राहुल लहू म्हात्रे, सचिन हिराजी पाटील, संतोष हिराजी ठाकूर, दिनेश जयराम ठाकूर, सौ प्रतिभा ताई पाटील, गुरूनाथ मारुती नाईक, प्रविण तुळशीराम पाटील, दिपेश मढवी, शालिनीताई म्हात्रे,  दत्तात्रेय पाटील, सुधीरजी कोळी, जयदीप नरेश पाटील, यश प्रदीप ठाकूर, विवेक पाटील व अन्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य 40 प्लस गावदेवी क्रिकेट संघ सानपाडा लाभले आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून कै.जयंत शांताराम सुतार यांच्या स्मरणार्थ सफाई कामगार (सानपाडा मर्यादित) यांच्यासाठी  गव्हाचे पीठ आणि ेसाखर दिले जाणार आहे.