सोनिया गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी चालवताना तारेवरची कसरत यापुढेही सुरुच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सरकारच्या कामाबाबत काही महत्वाच्या सूचनांचे पत्र पाठवले आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  

महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासाबद्दल मुद्दे उपस्थित केल्याचे सांगितले.महाविकास आघाडीच्या कामाबद्दल चार प्रमुख सूचना केल्या आहेत. किमान समान कार्यक्रमावर भर देण्याचा आग्रह चार प्रमुख गोष्टींवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या परिपत्रकात ‘किमान समान कार्यक्रमावरच सरकार चालवा’, असे नमुद केल्याचे म्हटले आहे. याबाबत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिल्याचे म्हटले आहे. सरकारच्या कामाबाबत उद्धव ठाकरे यांना सूचना करताना किमान समान कार्यक्रमावरच सरकार चालविण्याचे सांगताना दलित, आदिवासी, ओबीसींना जपण्याचे आवाहनही केले आहे.