सलग 3 दिवस बँका राहणार बंद

मुंबई ः या आठवड्यात सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. 25 डिसेंबर (शुक्रवार) ख्रिसमसमुळे राष्ट्रीय सुट्टी आहे. यामुळे बँकांमध्ये हा दिवस सुट्टीचा दिवस आहे. 26 डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार आहे ज्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील. यानंतर, 27 डिसेंबर रोजी रविवार आहे. हा दिवस बँक कर्मचार्‍यांसाठी आठवडी सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे आपले बँकेसंबंधी काही काम असल्यास ते 24 डिसेंबर पर्यंत पूर्ण करावे. 

वर्ष 2020 संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जण हा नवीन वर्षाच्या  स्वागताच्या तयारीमध्ये व्यस्त झाला आहे. अनेक जण नववर्ष सेलिब्रेट करण्यासाठी आपल्या आवडत्या ठिकाणी जाण्याचं प्लॅन करीत आहेत. दरम्यान, यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपण आपल्या बँकांची कामे करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून जर आपले बँकेसंबंधी काही काम असल्यास ते 24 डिसेंबर (गुरुवार) पर्यंत पूर्ण करावे. कारण त्यानंतर 25, 26 आणि 27 डिसेंबर रोजी बँका बंद असतील. कोरोना कालावधीती बँकांची बहुतेक कामे डिजिटल माध्यमातून केली जात आहेत. पण, अशी काही कामे आहेत ज्यांना बँकेत जाणे आवश्यक आहे. चेक क्लीयरन्स, कर्ज यासारख्या कामासांठी आपल्याला बँकेत जावेच लागते. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन आणि बँकेच्या सुट्ट्या ध्यानात ठेऊन आपल्या कामांचं प्लॅनिंग करा.