1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य

नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात 1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार असून सुट्ट्या पैशांची डोकेदुखीही थांबणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. 

येत्या 1 जानेवारी 2021पासून देशात सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज पडणार नाही. याचा प्रवाशांनाच फायदा होणार आहे. प्रवाशांचा सुट्ट्या पैशांची डोकेदुखी थांबणार आहेच शिवाय इंधन आणि वेळेचीही बचत  होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. सध्याच्या घडीला देशात फक्त राष्ट्रीय महामार्गांवरच 80 टक्के रकमेची वसुली फास्टॅगद्वारे केली जात आहे. 

नव्या वर्षात तुम्ही जर बाहेर जाणार असाल आणि तुमच्या वाहनामध्ये फास्टॅग नसेल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. सध्या टोलनाक्यावर अनेकदा टॅग नसतानाच फास्टॅगच्या मार्गिकेत अनेक लोक घुसताना दिसतात. वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्यामुळे असं होत असतं. मात्र, 1 जानेवारीपासून हे चित्रं दिसणार नाही.

फास्टॅग कुठे खरेदी कराल? कसे रिचार्ज कराल?
छकअख आणि 22 वेगवेगळ्या बँकेतून तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता. पेटीएम, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरही ते उपलब्ध आहे. त्याशिवाय ऋळपे झरूाशपीीं इरपज्ञ आणि झरूीां झरूाशपीीं इरपज्ञ कडूनही फास्टॅग दिलं जातं. जर फास्टॅग छकअख प्रीपेड वॉलेटशी कनेक्ट असेल तर चेकच्या माध्यमातून यूपीआय/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ छएऋढ/नेट बँकिंग आदींच्या माध्यमातून रिचार्ज केलं जातं. जर बँक खात्याशी फास्टॅग लिंक असेल तर तुमच्या खात्यातून थेट पैसे कट होतील. जर झरूीां वॉलेटला फास्टॅग कनेक्ट असेल तर त्यातून थेट रक्कम कापली जाते.
किती रिचार्ज करणार? वैधता किती?
तुमच्या फास्टॅग अकाऊंटमध्ये तुम्हाला किमान 100 रुपये ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक बँक त्यांच्या हिशोबाने रक्कम कट करेल. जर तुम्ही 200 रुपयांत एखाद्या बँकेतून फास्टॅग खरेदी केला तर तुम्हाला करही भरावा लागणार आहे. फास्टॅगची वैधता नसते. 
फास्ट टॅगशिवाय मार्गिकेत घुसल्यास?
तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तुम्हाला कोणीच मार्शल लाईनमध्ये घुसू देणार नाही. जर तुम्ही चुकून फास्टॅगच्या मार्गिकेत घुसल्यास तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.