थंडीचा जोर वाढणार

मुंबई : राज्यभर थंडीची हुडहुडी वाढत आहे. संध्याकाळी थंडीचा जोर वाढत जाऊन रात्री हुडहुडी भरणारी थंडी मुंबईसह उपनगरात अनुभवायला मिळत आहे.येत्या तीन-तीन दिवसांत या थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे थंडीचा जोर वाढणार आहे. पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईत थंडीचा मुक्काम असणार आहे.

उत्तर भारतात थंडी आहे. याचा परिणाम हा पुढील काही दिवस दिसून येणार आहे. तापमानात घट होणार असल्याने पुढील दोन ते तीन दिवस आणखी तापमानात घट होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा हुडहुडी वाढणार आहे.