छत्तीसगडहून आलेल्या तरुणीवर पनवेलमध्ये बलात्कार

आरोपीस पनवेल शहर पोलीसांनी 12 तासात केले जेरबंद 

पनवेल ः नाताळ व न्यु इयर साजरा करण्यासाठी छत्तीसगडहून मुंबईत आलेल्या तरुणीवर एका रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे. या घटनेतील आरोपीच्या पनवेल शहर पोलीसांनी 12 तासात मुसक्या आवळून त्याला गजाआड केले आहे. सचिन लालताप्रसाद शर्मा (26, रा. बारवाई गांव, पनवेल) असे आरोपीचे नाव आहे. 

सदर गुन्हयातील पीडीत तरुणी ही जिल्हा जसपुर, राज्य छत्तीसगड येथुन नाताळ व न्यु इयर साजरा करण्यासाठी मुंबईत आली होती. प्रथम ती झारखंड वरुन दिल्ली येथे आली होती. तेथे एक दिवस हॉटेल मध्ये राहुन पश्चिम एक्सप्रेस ने 22 डिसेंबर रोजी बांद्रा रेल्वे स्टेशन येथे आली होती. सदर ठिकाणी तिला रेल्वे टीसी यांनी एकटी असल्याचे पाहून चाइल्ड हेल्प लाईनच्या ताब्यात दिले व त्यांनी तिला सखी सेंटर मुलींचे होम मध्ये दाखल केले होते. तेथे तिची चौकशी करुन तिला सोडुन देण्यात आले. 26 डिसेंबर रोजी सदर पिडीत मुलगी ही सकाळी पनवेल रेल्वे स्टेशन येथे आली होती. सदर ठिकाणी शिवा नावाचे इसमाबरोबर तिची ओळख झाली होती व ती त्याचेसोबत राहीली होती. 27 डिसेंबरला सदर पिडीत मुलीने पनवेल रेल्वस्टेशन येथुन एका रिक्षाला हात दाखवुन गांधी गार्डन सोडण्यास सांगितले असता त्याने तिला सदर ठिकाणी घेवुन न जाता वडघर नदीच्या काठी, स्मशानभुमीच्या बाजूला झाडीमध्ये घेवून गेला. तिथे तिच्यावर दगड उगारुन तिला जीवे मारण्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि (गुन्हे) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्हयात गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रीक तपास चालु केला होता. सदर चौकशी सुरु असता आरोपीच्या ताब्यात असलेल्या संशयित रिक्षाबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली होती. त्यावरुन पुढे तपास सुरु करुन सदर आरोपीस बारवाई गाव, पोस्टे पोयंजे, ता. पनवेल येथुन रिक्षासह ताब्यात घेवुन अटक केले आहे. सदर गुन्हयात आरोपीबाबत कोणताही मागमुस नसतांना केवळ 12 तासात सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे. 

सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त बीपिन कुमार सिंह पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहा. पोलीस आयुक्त रविद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करुन उपकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास अधिकारी सपोनि मोनाली चौधरी व कारवाई पथकातील पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि शिंदे, पोउपनि सुनिल तारमळे, पोहवा विजय आयरे, वाघमारे, राजु खेडकर, विनोद पाटील,सुनिल गर्दनमारे, यादवराव घुले,पंकज पवार, परेश म्हात्रे, गणेश चौधरी व साळुखे यांनी उत्तम कामगिरी बजावली.