वाशीमध्ये गॅस पापईपलाईनला गळती

नवी मुंबई ः वाशी येथील सेक्टर 9 येथे पालिकेच्यावतीने सुरु असलेल्या खोदकामादरम्यान गॅस पाईपलाईन फुटली. यावेळी मोठ्या प्रमाणात वायु गळती सुरु झाली. हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशमन दलाले वेळीच यावर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.   काही वेळ येथे वाहतुककोंडीही झाली होती. 

स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने वाशी सेक्टर 9 येथे पालिकेच्यावतीने गटाराचे काम सुरु होते. यावेळी खोदकामादरम्यान जेसीबी गसॅ पाईपलाईनला लागल्याने गॅस पुरवठा करणारी वाहिनी फुटुन मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. जवळच अग्निशमन केंद्र असल्याने जवानांनी तातडीने घटनास्थळी घाव घेउन गळती आटोक्यात आणली. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर गळती थांबली. वाहिनी दुरुस्तीला 4 ते 5 तासाचा अवधी लागल्याने वाशीतील गॅपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता. तसेच गळतीवर नियंत्रण मिळवत असताना वाहतुक वळवल्याने परिसरात वाहतुक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.