दक्षिण नवी मुंबईला मिळणार हेटवणेचे पाणी

सिडकोचे नियोजन ; कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला 119 कोटी 80 लाख रुपये अदा 

नवी मुंबई ः खारघर, कळंबोली, पनवेल या दक्षिण नवी मुंबईतील नागरिकांना पाणीचटंाईचा सामना करावा लागत आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या पाहता ुपाणीटंचाई भासू नये म्हणूनेे सिडकोमार्फत आताच जास्त पाण्याची तजवीज करण्यात येत आहे. यासाठी पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून 120 दशलक्ष लिटर पाण्याचा जादा उपसा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला 119 कोटी 80 लाख रुपये अदा करण्यात आलेले आहेत. यामुळे पनवेल, खारघरची पाणी समस्या सुटणार आहे. 

सद्यस्थितीत नवी मुंबईतील पनवेल महानगरपालिका क्षेत्र, सिडको अधिकार क्षेत्रातील काही नोड व नजीकच्या परिसरातील गावे यांना हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत हेटवणे धरणातून सिडकोला 150 एमएलडी पाणी साठा उपलब्ध होत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने 250 एमएलडी क्षमतेचे कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरीत केले आहे. या धरणाच्या आराखडयचे काम प्रगतीपथावर आहे.  

सिडकोने पनवेल आणि उरण तालुक्यांत विकसित केलेल्या दक्षिण नवी मुंबईची लोकसंख्या 20 लाखांपर्यंत गेली आहे. या भागात येणारे तळोजा, नवीन रोडपाली, कामोठे, कळंबोली, उलवे आणि द्रोणागिरी या नोडमध्ये सिडकोची महागृहनिर्माण योजना तसेच विविध महत्त्वाचे प्रकल्प साकारण्यात येत आहेत. या भागातील निवासी क्षेत्रांची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच नवी मुंबईची वाढती लोकसंख्या आणि सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महागृहनिर्माण योजना आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) या प्रकल्पांमुळे सन 2050 पर्यंत नवी मुंबई क्षेत्रातील पाण्याची अंतिम मागणी 1275 एमएलडी पर्यंत असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सध्याच्या परिस्थितीत हेटवणे धरणातून तातडीने अतिरिक्त पाणी साठा मंजूर करून घेण्याचा व्यवहार्य निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. हेटवणे धरणातील 120 एमएलडी अतिरिक्त पाणी साठा मंजूर झाल्याने 2025 पर्यंत प्रस्तावित असणाऱया विविध प्रकल्पांची पाण्याची मागणी पूर्ण होणार आहे.  

हेटवणे धरणातून सिडकोद्वारे आणले जाणारे पाणी डोंगर उतारावरून येत असल्याने कमी दाब आणि अल्प पुरवठा अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सिडकोतर्फे हेटवणे जलवाहिनी भूमिगत करण्याचे काम गेल्यावर्षांपासून सुरू होते. हेटवणे धरणापासून शहराकडे येणाऱया जलवाहिनीसाठी हमरापूर येथे टेकडीच्या खालून साधारणत: 20 ते 25 मीटर खोलीवर बोगदा खोदण्याचे काम जवळ जवळ पूर्णत्वास आले आहे. या बोगदयाची लांबी 700 मीटर असून 1500 व्यासाची एम.एस. जलवाहिनी टाकण्यात येत आहे. हा प्रकल्प फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यामुळे हेटवणे धरणातून सिडकोला 30 एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा वाढणार आहे.  नवी मुंबई विमानतळ, नैना क्षेत्र यामुळे या भागाची लोकसंख्या वीस लाखांच्या घरात जाणार आहे. सिडकोने सध्या पाणीपुरवठयावर तात्काळ उपाय म्हणून हमरापूर भागातील टेकडया पार करून येणार्‍या जलवाहिनीला 700 मीटर बोगदा खोदून जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले असून हे पुढील महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे सिडको क्षेत्राला तीस दशलक्ष लिटर पाणी मिळणार असल्याने खारघर व उलवे या भागातील पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

दक्षिण नवी मुंबईतील पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिडकोने एका तज्ज्ञ संस्थेची नेमणूक केली असून ही संस्था भविष्यात लागणारे पाणी, त्याचे स्रोत यांचा अभ्यास करणार आहे. त्यानुसार सिडकोला मार्गदर्शनही करणार आहे. 
- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको