यंदा संक्रांतीचा गोडवा वाढणार

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी महागल्या आहेत. असं असलं तरी सर्वसामान्यांची यंदाची संक्रांत मात्र गोड होणार आहे. कारण तिळ-गुळाचे दर कमी झाले आहेत. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातून तिळाची आवक वाढली आहे. 

यंदा तिळ-गुळाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पांढरे तीळ किरकोळ बाजारात 120 ते 130 रुपये किलो आहेत. तर लाल तीळ 150 ते 160 रुपये किलो आहेत. त्यामुळे यंदाची मकरसंक्रांत गोड होणार आहे. मकर संक्रांतीला तिळ-गुळाचं अनन्य साधारण महत्वं आहे. नात्यांमध्ये गोडी राहावी या उद्देशानं एकमेकांना तीळगुळ देत गोड-गोड बोलण्याची विनंती केली जाते. तसंच जानेवारी महिन्यात थंडी मोठ्या प्रमाणात असते. थंड वातावरणात शरीराचं रक्षण करण्यासाठी तिळ-गुळ खाल्ले जातात. तीळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. तीळ उष्ण असल्यानं थंडीमध्ये शरीरात उष्णता निर्माण करतात.

खाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी वाढ

 खाद्यतेलामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या सोयाबीन तेलाच्या दरामध्ये वाढ झाली. खाद्यतेलांच्या किमंतीमध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी 100 रुपये किलो प्रमाणं मिळणार सोयाबीन तेल 135 रुपयांवर पोहोचलं आहे.

 सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने, सर्वसामान्यांचं बजेट बिघडलंय. दोन महिन्यात सर्वाधिक विकल्या जाणार्‍या सोयाबीनच्या खाद्यतेलाचे दर 35 रु. प्रति किलो वाढलेय. त्यामुळे किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाचा दर आता 135 रुपये किलोंवर पोहोचले आहेत. 

 पाम तेलाच्या दरातंही वाढ झाली असून, किरकोळ बाजारात पाम तेलाचे दर 145 रुपये किलोंवर पोहोचलेय. यंदा देशात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घाटलंय, त्यामुळेच देशात सोयाबीन आणि पामच्या कच्च्या तेलाची 60 टक्के आयात झालीय. आयातखर्च वाढल्यानेदेशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली.