जिल्हाप्रमुख मोरे मार्गदर्शक मंडळात

नवी मुंबई ः शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यातील निमंत्रण पत्रिकेतील नावाच्या वादळाचे खापर जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांनी चालविला आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नसून गायकवाड दाम्पत्यांना तेथील उमेदवारीची शाश्‍वती देऊन मोरेंच्या विरोधकांनी त्यांची रवानगी मार्गदर्शक मंडळात केल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत आहे. 

गेली 40 वर्ष जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हे नवी मुंबईच्या राजकारणात असून त्यांनी चार टर्म नगरसेवकपद नवी मुंबई महापालिकेत भुषविले आहे. मध्यंतरी तत्कालीन जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्याशी बिनसल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन नगरसेवकपद मिळविले होते. 2013 साली त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत सेनेचा भगवा पुन्हा खांद्यावर घेतला व संघर्ष करत विजय मिळवला. मागील निवडणुकीत त्यांना व त्यांच्या सूनेला पराभव पत्कारावा लागल्याने ते बॅकफुटवर गेले  होते. शिवसेनेेने नवी मुंबईसाठी दोन जिल्हाप्रमुख पदे तयार करुन त्यावर द्वारकानाथ भोईर व विठ्ठल मोरे यांची नियुक्ती केली.  

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यावर वाशी येथील शिवसेना मध्रवर्ती कार्रालराचा उद्घाटन सोहळा 3 जानेवारी रोजी करण्याचा घाट शिवसेनेने घातला होता. हे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. मात्र या सोहळ्राच्रा निमंत्रण पत्रिकेतून ऐरोली व बेलापूर मतदार संघातील ‘विजर’ वगळण्रात आल्राने नवी मुंबई शिवसेनेमधील अंतर्गत वाद समोर आला होता. व हा समारंभच रद्द करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. 

विरोधकांना आयती संधी यामुळे मिळाल्याने त्यांनी मोरे यांना मागदर्शक मंडळात पाठविण्याची रणनिती आखल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत आहे. विठ्ठल मोरे मागत असलेले प्रभाग नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या गायकवाड दाम्पत्यांना देऊन हे सोपस्कर पार पाडण्याची रणनिती आखल्याचे सुत्रांकडून कळत आहे. या रणनितीला विठ्ठल मोरे कशापद्धतीने हाताळतात याकडे आता नवी मुंबईतील शिवसैनिकांसह भाजपाही लक्ष देऊन आहे.