पनवेलमध्ये मोफत फिरते आरोग्य सेवा केंद्र

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जे एम म्हात्रे चारीटेबल ट्रस्ट आणि निर्माण डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फिरते आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. ही मोहीम रविवारपासून (दि.10) पासून पुढील दहा दिवस राबवण्यात येणार आहे. या केंद्राचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, सोसायटी पदाधिकारी आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. 

माझा प्रभाग,परिसर निरोगी व्हावा, वृद्ध, लहान मुले तरुण यांच्या आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी छोटासा प्रत्येकाच्या दारापर्यंत मोफत फिरते आरोग्य सेवा केंद्र येऊन तपासणी करणार आहे. प्रथमोपचार, रक्तदाब, शुगर, ऑक्सिजन, टेंपरेचर सारख्या आजारांची मोफत तपासणी करून तज्ञांकडून मोफत सल्ला देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात प्रबोधन सोसायटी पासून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.