उच्चांकी मालवाहतुकीसह जेएनपीटीने केली वर्षाची सांगता

मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) डिसेंबर, 2020 मध्ये 459,920 दशलक्ष टीईयूची हाताळणी केली. गेल्या वीस महिन्यांतील एक महिन्यात सर्वाधिक कंटेनर हाताळणीचा हा उच्चांक आले. मागील वर्षी याच महिन्यात केलेल्या कंटेनर हाताळणीच्या तुलनेत हे 9.90% अधिक आहे आणि मालवाहतुकीच्या संदर्भात डिसेंबर-2019 मध्ये हाताळलेल्या एकूण 5.79 दशलक्ष टन वाहतूकीच्या तुलनते 10.04 % वाढ झाली आहे. 

कंटेनर ट्रेन्सच्या बाबतीत सुद्धा जेएनपीटीने डिसेंबर 2020 मध्ये 556 कंटेनर ट्रेन्सची विक्रमी हाताळणी केली आहे. कंटेनर ट्रेन्सच्या सरासरी मासिक टर्मिनल हाताळणी वेळेमध्ये सुद्धा सुधारणा झाली असून ती आता सप्टेंबरमधील 6:18 तासांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये 4:42 तास झाली आहे. रेल्वे गाड्यांची सरासरी मासिक फेरीचा वेळ देखील सप्टेंबरच्या 13:34 तासांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये 9:35 तासांवर कमी झाली आहे. कॅलेंडर वर्ष 2020 दरम्यान जेएनपीटी मध्ये एकूण 4.47 दशलक्ष टीईयूची कंटेनर वाहतूकीची हाताळणी करण्यात आली  ज्यामध्ये एपीएम टर्मिनल मुंबई (जीटीआय) ने 1.69 दशलक्ष टीईयू, डीपीवर्ल्ड एनएसआयजीटीने 0.77 दशलक्षटीईयू, डीपीवर्ल्ड एनएसआयसीटीने 0.64 दशलक्ष टीईयू, जेएनपीसीटीने 0.56 दशलक्ष टीईयू आणि बीएमसीटीने0.81 दशलक्ष टीईयूची हाताळणी केली आहे. कॅलेंडर वर्ष 2020 दरम्यान जेएनपीटी मध्ये द्रव व अन्य कार्गोसह एकूण 62.32 दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली.