तणाव मुक्ती आणि योगाभ्यास 2

तणाव मुक्ती आणि योगाभ्यास याविषयीचा पहिला भाग मागिल अंकात आपण प्रदर्शित केला. आता याविषयी आणखी सविस्तर माहिती या भागात घेऊ. 

मानसिक साधना ही योगसाधनेची फार महत्वाची मानली जाते. योग साधनेचे ध्येय म्हणेज समाधी. पण आपणासारख्या सामान्य माणसांना समाधीचा विचार मनात आणणे कठिण आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा संसारामध्ये गुंतुन गेलेला आहे. हकाहीजण व्यावसायामध्ये मशगुल आहेत. त्यांना समाधिपर्यंत योग साधना करणे अरघड आहें. आरोग्य राखण्यासाठी धारणा, ध्यान, करणे अतिशय जरुरीचे आहे. 

 आपण आता मनस्वास्थासाठी करावयाचे योग प्रकार पाहू.

दिर्घश्‍वास  

कोणत्याही बैठक स्थितीमध्ये बसावे. पाठ नैसर्गिक स्थितीमध्ये ठेवावी. दोनही हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये द्रोणासारखी स्थितीमध्ये ठेवावेत. तळवा गुडघ्यात असावा. चेहर्‍याचे स्नायू शिथील ठेवावेत. दोनही हात शिथील असावेत. पोटाचे स्नायू शिथील असावेत. श्‍वासप्रश्‍वास नैसर्गिक ठेवावा. आता हळुवारपणे श्‍वास नाकावाटे आत घ्यावा बाहेर सोडावा. असे दोन तीन वेळेस करावा नंतर पुर्णपणे दिर्घ श्‍वास आतमध्ये घ्यावा. छातीचे स्नायू पुर्णपणे प्रसरण पावतील आणि हळूवापरपणे श्‍वास बाहेर सोडावा. सदर क्रिया अतिशय शिस्तबद्ध करावी. मनाला संपुर्णपणे श्‍वासावर केंद्रित करावे. ही साधना सुरुवातीला दोन तीन मिनीटे करावी. नंतर हळूहळू वाढवत आपल्या क्षमतेनुसार पाच ते दहा मिनिटेपर्यंत करावी. साधना संपल्यावर डोळे मिटून ध्यानस्थ बसावे. थोडावेळानंतर हळूहळू डोळे उघडावे आणि आरामदायी स्थितीमध्ये जावे. या पद्दतीने सकाळी व रात्री झोपण्या आधी दोन तीन आवर्तने करावीत.

 फायदे
 मनाची चलबीचलता कमी होऊन मन शांत होते.
 हार्मोनल बँलेन्स सुधारते
 मनातील तणाव हळूहळू कमी होत जाते. 
 श्‍वसन क्रिया सुधारते.
 फुफ्फुसांचे कार्य सुधारते
 रक्ताभिसरण सुलभ होणेस मदत होते. श्‍वासावाटे शरिरामध्ये येणारी प्राणिक उर्जा शरिरारतील छोट्या छोट्या पेशीपर्यंत सुलभतेने जाते. 
 शरिारची प्रतिकारशक्ती वाढते
 शारिरिक व मानसिक उत्साह द्विगुणित होतो. 


उदरश्‍वसन
कोणत्याही आसनामध्ये बसावे.ज्यांना पद्मासन घालता येते त्यांनी ते घालावे. ज्यांना वज्रासन येते त्यांनी ते करावे. दोनही हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये द्रोणासारखी स्थितीमध्ये ठेवावेत. तळवा गुडघ्यात असावा. चेहर्‍याचे स्नायू शिथील ठेवावेत. दोनही हात शिथील असावेत. पोटाचे स्नायू शिथील असावेत. श्‍वासप्रश्‍वास नैसर्गिक ठेवावा. दोन हात शिथील खांदे थोडे मागे घ्यावेत. जेणेकरुन छातीचा भाग थोडा पुढे येईल. आता नैसर्गिक श्‍वसन चालू ठेवावे. आता पुर्णपणे थोडे खांदे वरती घेऊन छातीचा भाग फुगवून पुर्णपणे श्‍वास आत घ्यावा. व छातीला स्थिर ठेवावे. पोट थोडे आत जाईल. आता उजवा हात पोटावर ठेवावा आणि छातीची हालचाल न करता पोटाची हालचाल करुन श्‍वास प्रश्‍वास करावा. यालाच उदर श्‍वसन म्हणतात. कमीत कमी दहा वेळा श्‍वासप्रश्‍वास करावा. नंतर हळूहळू छातीला खाली घ्यावे व पुर्ववत नैसर्गिक श्‍वास घ्यावा. हे झाले एक आवर्तन. अशी आपल्या क्षमतेनुसार दोन तीन आवर्तने करावीत. 

पोटाचे गंभीर आजार आहेत त्यांनी हा अभ्यास योग्य तर्‍हेने अनुभवी योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावा. शक्यतो अनोषापोटी हा अभ्यास करावा. जेवल्यावर किंवा नाष्टा केल्यावर करु नये

 •  फायदे
   श्‍वसन क्षमता वाढते.
   फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते
   रक्ताभिसरण क्रिया सुधारते
   पोटाचे स्नायुंची लवचिकता वाढते
   उदरपटल लवचिक बनते.
   पोटातील अवयवांना चांगला मसाज होता. त्यामुळे पाचन संस्थेचे कार्य सुधारते.
   उत्सर्जन संस्थेचे कार्य सुधारते.
   पोटातील गॅसेसचे, वाताचे प्रमाणे कमी होते.