खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


32 वा रस्ता सुरक्षा अभियान सुरु

18 जानेवारी 2021 ते 17 फे्रबुवारी 2021 या कालावधीत 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत, वाहतुक विभागाचा ‘‘रस्ता सुरक्षा अभियान-2021’’ कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा 18 जानेवारी 2021 नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय, मैदान सीबीडी-बेलापुर, नवी मुंबई येथे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने हा समारंभाचा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह करण्यात आला. 18 जानेवारी 2021 ते 17 फे्रबुवारी 2021 या कालावधीत 32 वा रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्यात येणार आहे. 

सदर कार्यक्रमास पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, डॉ.बी.जी. शेखर पाटील (अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा), पुरुशोत्तम कराड (पोलीस उप आयुक्त वाहतूक), अनिल पाटील (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल विभाग), प्रविणकुमार पाटील (पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा), रुपाली अंबरे (पोलीस उप आयुक्त विशेष शाखा), अभिजीत शिवथरे (पोलीस उप आयुक्त मुख्यालय), जग विख्यात सुप्रसिध्द जादुगर सतिश देशमुख, प्रतिष्ठीत नागरीक, जड अवजड वाहतुक असोशियनचे पदाधिकारी, वाहतुक विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार व उप प्रदशिक परिवहन विभाग, पनवेल येथील अधिकारी व कर्मचारी असे उपस्थित होते.

पोलीस उप आयुक्त, वाहतूक पुरुशोत्तम कराड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. स्ता सुरक्षेबाबत जनजागृतीच्या दृष्टीकोनातून वाहनचालकानंी तसेच नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोपरपणे पालन करावे यासाठी मोठया प्रमाणात जन जागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले. याचाच एक भाग म्हणुन नवी मुंबई वाहतुक विभागातर्फे जनतेमध्ये व वाहनचालकांमध्ये केल्या जाणार्‍या जन जागृती कार्यक्रमांमध्ये पत्रकार बांधवाची मोठया प्रमाणात मदत होत असते. म्हणुन यावर्षी रस्ता सुरक्षा अभियानमध्ये नवी मुंबई वाहतुक विभागातर्फे छायाचित्रकार व जनतेसाठी ‘‘छायाचित्रण’’ या स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे करण्यात येणार असल्याचे तसेच सदर रस्ता सुरक्षा अभियानमध्ये सर्व धार्मिक स्थळ येथे येणारे भाविकांना रस्ता सुरक्षा अभियांनाची माहिती देवुन जन जागृती करण्यात येणार आहे. तसेच ‘‘ जछए ऊअध थखढक झजङखउए’’ हा अभिनव उपक्रम राबवुन त्यामध्ये विविध सेवाभावी संस्था यांना सहभागी करुन घेवुन जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने रस्ता सुरक्षा अभियान दरम्यान शालेय विद्यार्थ्यांमध्ये जन जागृती करणेकरीता पपेट शो मार्फत ऑनलाईन क्लासचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. अनिल पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांनी त्यांचे भाषणात रस्ता सुरक्षा अभियान दरम्यान शालेयविद्यार्थी यांचेमध्ये शॉर्ट फिल्मचे प्रसारण करुन जन जागृती करण्यात येणार असुन वाहन चालकासाठी विविध उपक्रम राबवुन जन जागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले. बिपीन कुमार सिंह यांनी नवी मुंबईची लोकसंख्या 35 ला खापेक्षा जास्त असुन ज्याप्रमाणात शहरी करणामध्ये वाढ होत आहे त्यानुसार लोकसंख्येमध्ये आणखी वाढ होणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयहद्दीमध्ये दोन महानगरपालिका व एक नगरपरिषद तसेच पनवेल व उरण मधील ग्रामिण भागाचा समावेश होतो. आपले हद्दीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त वाहने असुन त्यामध्ये दररोज शेेकडो वाहनांची भर पडत आहे. 2020 मध्ये जगभरात साधारणपणे 1.35 मिलियन लोकांचा मृत्यु झालेला आहे. 

ब्लॅक स्पॉट कमी करणेसाठीही वाहतुक पोलीस प्रयत्नशील आहेत. यासाठी नवी मुंबई वाहतुक विभागाकडुन इंजिनिअरींग, एज्युकेशन आणि इम्फॉरसमेंट या त्रिसुत्रीचा वापर करणेत येत आहे. इंजिनिअरींग हेड खाली रस्त्याच्या सुव्यवस्थेसाठी तसेच देखभालीसाठी आम्ही संबंधित यंत्रणांशी पाठपुरावा करत आहोत. यामध्ये सर्व सिग्नल यंत्रणा दुरुस्त करुन चालु ठेवणे, सिग्नलचे टायमर चालु ठेवणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे सुस्थितीत ठेवणे याचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. एज्युकेशन हेड खाली रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जन जागृती करणेत येत आहे त्याच बरोबर शाळेतील मुलांना रस्ते सुरक्षेबद्दल शिक्षण देवुन त्यांना व त्यांचे मार्फत त्यांचे पालकांना रस्ते सुरक्षेबाबत जागृत करणेत येत आहे. इम्फॉरसमेंट या सदरखाली जे नागरीक रस्ते सुरक्षा नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे वर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सर्व नवी मुंबईकर या अभियानामध्ये सहभागी होतील व वाहतुक सुरक्षेसंबंधात जागरुक होवुन स्वत:व नवी मुंबईला सुरक्षित ठेवतील ही आशा पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली. जग विख्यात सुप्रसिध्द जादुगर सतिश देशमुख यांनी उपस्थित मान्यवर तसेच नागरीक व पोलीस अधिकारी/अंमलदार यांना जादुचे प्रयोग करुन विदेशामध्ये वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळत असल्याबाबतचा अनुभव सांगुन उपस्थितांना त्याप्रमाणे वाहतुक नियमांचे पालन करणेबाबत आवाहन केले. 

2020 मध्ये 209 जणांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यु 
नवी मुंबई मध्ये 2020 मध्ये एकुण 209 जणांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यु झालेला आहे. रस्ते अपघात वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे होत असुन यामध्ये महत्वाचे कारणे हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, जास्त वेगाने गाडी चालविणे, दारु पिऊन गाडी चालविणे, गाडी चालविताना मोबाईल वर बोलणे, सिग्नल जंप करणे इ. कारण आहेत. यावर्षीच्या अपघातामध्ये मोटारसायकल स्वरांचे अपघातात मृत्युची संख्या 107 एवढी असुन एकुण मृत्युपैकी हे प्रमाण 51% एवढी आहे. 
16 ठिकाणी ब्लॅक स्पॉट 
सायन-पनवेल हायवे, ठाणे-बेलापुर, सीबीडी, जेएनपीटी, कळंबोली, तळोजा तसेच पाम बीच रोड हे महत्वाचे रोड असुन यावरिल वाहतुक सुरळीत ठेवणे तसेच अपघात व अपघाती मृत्युवर नियंत्रण ठेवणे हे महत्वाचे काम आहे. नवी मुंबई मध्ये एकुण 16 ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे. यामध्ये विशेष करुन वाशी खाडीपुल, पामबीच रोड, सीबीडी ब्रिज व नावडा फाटा यांचा समावेश होता. त्याचा अभ्यास करुन त्यामध्ये सुधारणा करणेसाठी सर्व संबंधित विभागाबरोबर पाठपुरावा करुन प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणुन पुर्वीचे ब्लॅक स्पॉटच्या संख्येमध्ये 4 ने कमी झालेले आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट