खोबर्‍याच्या एमएसपीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने 2021 हंगामासाठी सुक्या खोबर्‍याच्या किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) मान्यता दिली आहे.

तेल काढण्याच्या घाणीसाठी उपयुक्त उत्तम सरासरी गुणवत्ता (एफएक्यू) असलेल्या खोबर्‍याच्या एमएसपी मध्ये 375 रुपये वाढ करण्यात आली आहे जी 2020 च्या प्रति क्विंटल 9960 रुपयांवरून वाढवून 2021 हंगामासाठी 10335 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. अख्ख्या नारळासाठी 2020 हंगामात असलेला 10,300 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत 300 रुपयांनी वाढवून 2021 हंगामात 10,600 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चापेक्षा घोषित झालेला किमान आधारभूत किंमत खोबर्‍यासाठी 51.87 टक्के आणि अख्ख्या नारळासाठी 55.76 टक्के परतावा मिळवून देतो.

कृषी खर्च व मूल्य आयोगाच्या (सीएसीपी) शिफारसींवर आधारित ही मंजुरी आहे. सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार सन 2021 च्या हंगामात खोबर्‍यासाठी किमान आधारभूत किंमतीमधील वाढ अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या तत्त्वानुसार आहे. 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने किमान 50 टक्के नफा सुनिश्चित करणे हे महत्त्वपूर्ण आणि प्रगतिशील पाऊल आहे. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) हे नारळ उत्पादक राज्यांतील एमएसपी आधारभूत कार्ये करण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून काम करत राहतील. सन 2020 च्या हंगामात सरकारने 5,053.34 टन नारळ आणि 35.58 टन खोबर्‍याची खरेदी केली असून त्याचा फायदा 4,896 नारळ उत्पादकांना झाला.