Breaking News
मुंबई : रिएल इस्टेट क्षेत्राचा 2020 च्या चौथ्या तिमाहीमधील (ऑक्टोबर - डिसेंबर 2020) 27 वा नाइट फ्रँक-फिक्की-एनएआरईडीसीओ रिअल इस्टेट सेंटिमेण्ट इन्डेक्स प्रसिद्ध झाला आहे. या सर्व्हेक्षणानुसार पहिल्यांदाच चौथ्या तिमाहीमध्ये 54 गुणांसह या क्षेत्राने आशावादी विभागात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यामध्ये या क्षेत्रामध्ये सकारात्मक मागणी निर्माण होण्याची आशा आहे.
गेल्या एप्रिल-जून 2020 च्या 31 गुणांच्या तुलनेत सध्याचा इन्डेक्स हा उच्च स्तरावर आहे. भागधारकांच्या संदर्भात डेव्हलपर्स व नॉन-डेव्हलपर्सनी (बँका, एनबीएफसी व पीई फंड्स) 2020 च्या चौथ्या तिमाहीमधील भावी सेंटिमेण्ट स्कोअरमध्ये सुधारणा केली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात रियल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला होता. जून 2018 च्या तुलनेत जून 2019 साली रियल इस्टेट क्षेत्राचे 80 टक्के नुकसान झालं होतं. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यात, डिसेंबरपर्यंत राहत्या घरांची आणि कार्यालयीन जागेसाठी मागणी वाढल्याचं दिसून आलं. महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प ड्यूटीमध्ये केलेली कपात, कमी व्याजदर, विकसकांनी राबवलेल्या अनेक आकर्षक योजना या सारख्या विविध कारणामुळे पुन्हा एकदा या क्षेत्रामध्ये आशादायक वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं.
या क्षेत्राचा इन्डेक्स हा या वर्षाच्या अखेरपर्यंत 65 गुणांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. फ्यूचर सेंटिमेण्ट इन्डेक्स ने देखील 2020 च्या तिसर्या तिमाहीमधील 52 गुणांपासून 2020 च्या चौथ्या तिमाहीमध्ये 65 गुणांपर्यंत प्रबळ वाढीची नोंद केली. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या पश्चिमी भागातील फ्यूचर सेंटिमेण्ट इन्डेक्समध्ये लक्षणीय वाढ दिसण्यात आली. या विभागाचे फ्यूचर सेंटिमेण्ट 2020 च्या तिसर्या तिमाहीमधील 47 गुणांवरून 2020 च्या चौथ्या तिमाहीमध्ये 66 गुणांपर्यंत वाढले
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, नवीन वर्षात या क्षेत्राची सकारात्मक सुरुवात करताना आगामी महिन्यांमध्ये प्रमुख आर्थिक निर्देशकांवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai