मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

पालिका सार्वत्रिक निवडणुक 2021 ; मतदार यादी तयार करण्याचे राज्य निवडणुक आयोगाचे आदेश

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून सर्वपक्षीय तयारीला लागले आहेत. मतदार यादीचा कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. अखेर राज्य निवडणुक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असून पालिका सार्वत्रिक निवडणुक 2021 करिता मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाने पारित केले आहेत. 15 जानेवारी 2021 पर्यंत अद्यायवत केलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांकरिता वापरण्यात येणार आहे.

नवीन मतदारांना निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून निवडणूक आयोगाकडून मतदार यादी कार्यक्रम नव्याने जाहीर केला आहे. याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी केले आहे. नवी मुंबई महानगरापालिकेची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपुष्टात आली. त्याअनुषंगाने मतदार यादी बनविण्याचा कार्यक्रम सुरु होता. मात्र दरम्यान कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्य निवडणुक आयोगाने निवडणुकांची कार्यवाही आहे त्या टप्प्यावर स्थगित केली होती. सदर मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर असल्याने नवीन मतदारांना निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेता यावा या उद्देशाने राज्य निवडणुक आयोगाने फेब्र्रुवारी-मार्च 2020 मध्ये राबविलेला मतदार यादी कार्यक्रम रद्द केला. त्यामुळे 2020 मध्ये मदत संपणार्‍या महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेची कार्यवाही पुर्ण झाली असून त्याकरिता मतदार यादीचा कार्यक्रम देणे आवश्यक आहे. 15 जानेवारीपर्यंत प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करण्यात येणार आहे. 

मतदार यादीचा कार्यक्रम
प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे - 16 फेब्रुवारी 2021
प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालवधी - 16 फेब्रुवारी 2021 ते 23 फेब्रुवारी 2021
प्र्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे - 3 मार्च 2021
मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे-  8 मार्च 2021
अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करणे - 12 मार्च 2021
सार्वत्रिक निवडणुका होणार्‍या महापालिका
नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापुर,
रिक्त पदांच्या पोटनिवडणुका होणार्‍या पालिका
नाशिक, धुळे, परभणी, ठाणे, अहमदनगर, नांदेड-वाघाळा, नागपुर, मिरा-भाईंदर, मालेगाव, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापुर, सांगली-मिरज- कुपवाड, अकोला, भिंवडी निजामपुर