हिट अँण्ड रन प्रकरणातील आरोपी अटक

मर्सिडीजच्या धडकेत दोन भावांचा मृत्यू; अ‍ॅबोट हॉटेल मालकाचा मुलगा रोहन अ‍ॅबोट अटकेत 

नवी मुंबई : नवी मुंबईत मर्सिडीज कारच्या धडकेत दोघा भावंडांच्या मृत्यू झाला होता. या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रोहन अ‍ॅबोट याला अटक केली आहे. रोहन हा प्रसिद्ध अ‍ॅबोट हॉटेलच्या मालकाचा मुलगा आहे. 

नवी मुंबईतील पामबीच रस्त्यावर अपघात करून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी ताब्यात घेतले. शनिवार रात्री दीड वाजता पामबीच मार्गावर दुचाकीला धडक देऊन आरोपी पळून गेला होता. रोहन अ‍ॅबॉर्ट (वय 32) याला पोलिसांनी अटक करुन कोर्टात हजर केले असता बेलापूर कोर्टातून आरोपीला जामीन मिळाला आहे. कारच्या धडकेत अक्षय गमरे आणि संकेत गमरे या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला होता. मयत तरुण मुंबईतील पोलीस अधिकार्‍याची मुलं आहेत. हे दोघे भाऊ स्क्रीन प्रिंटिंगचे काम करून बेलापूर येथून तुर्भे सेक्टर 20 येथील राहत्या घरी दुचाकीने येत होते. यावेळी भरधाव मर्सडिज कारने दोघांना धडक दिली. एकाचवेळी दोन्ही मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.