शुक्रवारी वाशीत ‘संवाद व्यवस्थेशी’

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने चर्चासत्र 

नवी मुंबई : 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने नवी मुंबई पोलीस वाहतुक विभाग व नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता वाशीमध्ये संवाद व्यवस्थेशी, एक पाऊल अपघातमुक्त समाजाकडे या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ञ व मान्यवर सहभागी होणार आहेत.  

देशभरात होणार्‍या रस्ते अपघातात दरवर्षी लाखोंच्या संख्येने निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. परिणामी अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. या रस्ते अपघातातील मृतांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय असून दिवसेंदिवस रस्ते अपघातात तसेच त्यातील मृत व जखमींमध्ये वाढ होत आहे. रस्ते अपघात कमी व्हावेत, यासाठी संपुर्ण राज्यभर वाहतुक पोलिसांकडून संपुर्ण राज्यभर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने वाहतुक पोलिसांकडून जनजागृतीपर विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  

रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई वाहतुक विभागाच्या वतीने 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये संवाद व्यवस्थेशी...एक पाऊल अपघात मुक्त समाजाकडे या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, परिवहन नियोजन तज्ञ अमोल खैरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्य शुभदा नायक व मनोपोचर तज्ञ विकास देशमुख व अन्य मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली. या चर्चासत्रामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील कराड यांनी केले आहे.