रसिका गोखलेचे सीएच्या परिक्षेत उत्तुंग यश

नवी मुंबईत प्रथम तर देशात अकरावा येण्याचा मान

नवी मुंबई : नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या लेखा परीक्षकांच्या (सी.ए) अंतीम परीक्षेत नेरुळ येथे राहणार्‍या रसिका राहूल गोखले हिने भारतातून अकरावा तर नवी मुंबईतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. रसिका गोखले हिने मिळविलेल्या या उत्तुंग यशानंतर तिच्यावर सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  

रसिका ही पोतदार महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिचे शालेय शिक्षण वाशीतील फादर अग्नेल शाळेमधून झाले आहे. रसिकाने आर्टिकलशीप तिच्या आईवडिलांच्या गोखले असोसिएट्स या सीए फर्म मधून पुर्ण केले आहे. तसेच तिने नऊ महिने डलॉइट या फर्म मध्येही अनुभव घेतला आहे. रसिकाने सीएच्या आयपीसीसी परीक्षेत देखील नवी मुंबईत दुसरा क्रमांक मिळविला होता. भारतीय भाषांबरोबरच रसिकाने चायनीज भाषेत देखील विशेष प्राविण्य मिळवले आहे. सीए नंतर सीआयएमए हे लंडन मॅनेजमेंटचे शिक्षण पुर्ण करुन गोखले असोसीएट्स मध्ये काम करुन नवी मुंबईतील नवउद्योजकांसाठी व्यासपीठ स्थापन करुन त्यात भरीव कार्य करत राहण्याचा तिचा मानस आहे.