भेटलीस तू पुन्हा मला

चिंब ओल्या पावसात भेटलीस तू पुन्हा मला
पुन्हा एकदा जाग्या झाल्या आठवणी त्या मला
का होतयं अस कधी कधी माहित नाही मला 
पुन्हा एकदा प्रेमाच्या दुनियेत हरवायचं मला
तूझ्या सोबतच प्रेमाच्या पावसात चिंब वाहायचं मला
पुन्हा एकदा त्याच पावसात घट्ट मीठी मारायची मला
आठवला पावसाचा पहिला क्षण तो मला
आणि पुन्हा एकदा दिसली त्या क्षणी तू मला
चिंब ओल्या पावसात भेटलीस तू पुन्हा मला
पुन्हा एकदा जागी झाल्या आठवणी त्या मला....
पुन्हा एकदा जागी झाल्या आठवणी त्या मला....

- प्रसाद सोनवणे