काळाचा घाला ; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात पाच ठार तर पाच जखमी

नवी मुंबई ः सोमवारी मध्यरात्री मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला.  यात पाच जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. नवी मुंबई महापालिका अधिकारी वैभव झुंझारे यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण मुंबईकडे येणार्‍या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री दीड वाजता अपघात झाला. कंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रक या  पाचही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कंटेनर पुढे चाललेल्या चार गाड्यांवर आदळला. यात कंटेनरसह दोन करा आणि एक टेम्पो आणि ट्रक या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेलो होते. ते परतत असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान, त्यांच्यासोबत आणखी दोन कार होत्या. परंतु मुबंईकडे जाताना दोन कार पुढे निघून गेल्या. मात्र, दोन कारना अपघात झाला. दरम्यान, नवी मुंबईतील डॉक्टर वैभव झुंजारे यांची आई, पत्नी आणि 5 वर्षीय मुलीचा या अपघातात मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत डॉ. वैभव झुंजारे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. जखमींपैकी दोघांना पनवेल, दोघांना वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातातील मृतांची नावे
1. मंजू प्रकाश नायर - 58 , रा. गोरेगाव मुंबई
2. डॉ. वैभव वसंत झुंजारे - वय 41 , रा. नेरुळ नवी मुंबई 
3. उषा झुंजारे वय - 63 , रा . नेरुळ नवी मुंबई
4. वैशाली वैभव झुंजारे वय 38 रा. नवी मुंबई
5.  श्रिया वैभव झुंजारे वय 5 रा. नेरुळ नवी मुंबई
जखमींचे नावे
1. स्वप्नील कांबळे वय 30 , रा. गोरेगाव मुंबई
2. प्रकाश नाहर , वय 65 रा. गोरेगाव मुंबई
3. अर्णव झुंजारे वय 15 रा. नेरुळ नवी मुंबई
4. किशन चौधरी , गंभीर जखमी
5. काळूराम जाट , गंभीर जखमी