...नाहीतर न्हावा-शिवडी सागरी सेतुचे काम रोखणार

प्रकल्पग्रस्त शेतकरी-मच्छीमारांना न्याय द्या - कामगार नेते महेंद्र घरत

उरण ः न्हावा-शिवडी सागरी महार्मागाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. या प्रकल्पासाठी 12 वर्षापुर्वी जमीन संपादन करण्यात आली. मात्र त्याचा मोबदला अजून सिडकोने दिलेला नाही. उलट प्रकल्पाच्या मार्गातील शेतकर्‍यांची बांधकामे तोडली जात आहेत. त्युमळे प्रकल्पग्रस त शेतकर्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. बाधित शेतकर्‍यांना आणि मच्छमार्‍यांना न्याय मिळाला नाही तर न्हावा-शिवडी सागरी सेतुचे काम रोखणार असल्याचा इशारा सिडको व एमएमआरडीएला कामगार नेते महेंद्र घरत यांनी दिला आहे. 

न्हावा-शिवडी सागरी महार्मागासाठी जमिनीचे भुुसंपादन 12 वर्षापुर्वी करण्यात आले. परंतु त्यापोटी जमिनीचा मोबदला अजुनही सिडकोच्या माध्यमातून देण्यात आलेला नाही. उलट जमिनीचा सातबारा शेतकर्‍यांच्या नावावर असुनही सिडकोचे अतिक्रमण पथक सागरी सेतुच्या मार्गतींल बांधकामे तोडीत आहे. हा प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांवर अन्याय आहे. तसेच सागरी महामार्ग बाधीत मच्छिमारांचे 25000 पुनर्वसनाचे अर्ज एमएमआरडीए प्रधिकरणाकडे पडून आहेत. सातत्याने पाठपुरावा, करून सुद्दा मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भांत एमएमआरडीचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी व मच्छिमारांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. यावर मीठ चोळल्याप्रमाणे सातत्याने कारवाईचा बडगा सिडकोचे अधिकारी करीत आहेत. आज जासई, चिर्ले विभागातील कारवाईला विरोध करण्यासाठी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जमले होते. यावेळी कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडको व एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना न्याय मागण्या पुर्ण होत नाहीत तो पर्यंत न्हावा-शिवडी सागरी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल व 1984 च्या गौरवशाली शौर्यशाली लढयाची पुनरावृत्ती करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सनीशेठ ठाकूर, डी.पी. घरत, सुरेश पाटील, माजी सरपंच चिर्ले राजू घरत व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसतं, वाया जाऊ दयायचं नसतं या शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते माजी खासदार दि.बा.पाटील साहेबांनी दिलेली शिकवण आम्ही विसरणार नाही, पाच हुताम्यांच्या हौताम्याने आणि गौरवशाही-शौर्यशाली लढयाने जे आम्ही मिळविले ते जर कोणी हिराऊन घेणार असेल तर त्यांना या हुताम्यांच्या भुमीत आम्ही पाय ठेऊ देणार नाही.  
-महेंद्र घरत, कामगार नेते