मिस नवी मुंबईसाठी सोळा सौंर्द्यवती सज्ज

27 फेब्रुवारीला होणार अंतिम स्पर्धा 

नवी मुंबई ः ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करुन आपले नशीब आजमावण्यासाठी ईच्छुक असणार्‍यांना व्यासपीठ देऊन त्यांना यशाच्या शिखरावर नेणार्‍या ‘मिस नवी मुंबई’ स्पर्धेने 10 वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे. मिस नवी मुंबई 2021 साठीच्या अंतिम फेरीसाठी सोळा सौंर्द्यवती सज्ज झाल्या आहेत. बुधवारी वाशीतील फोर पाईंट या पंचतांरांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेद्वारे त्यांची नावे जाहीर करण्यात आली. 

नवी मुंबई शहराची सांसकृतिक वारसा जपणारी मिस नवी मुंबई ही सौंर्द्य स्पर्धेने दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. या स्पर्धेने कित्येक सौंर्द्यवतींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करुन दिली आहे. यु अँड आय एन्टरटेन्टमेंट या संस्थेने दर्जात्मक व सातत्याने ही स्पर्धा आयोजित करीत एका उंचीवर आणून ठेवली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कित्येक सौंर्द्यवतींना आत्मविश्‍वास तर मिळालाच आहे तसेच त्यांनी स्वतःचे नाव कमविले आहे. याआधी 9 वर्ष सातत्याने गॅमरच्या दुनियेत प्रवेश करुन ईच्छिणार्‍या तरुणींचे स्वप्न या स्पर्धेने पुर्ण करुन यंदा 10 वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे. यंदा 280 सौंर्द्यवतींनी आपले नशीब आजमावण्यासाठी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातून 16 गुणवान सौंर्द्यवतींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. बुधवारी वाशीतील फोर पाईंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये अंतिम फेरीत पोहचलेल्या या सोळा सोंर्द्यवतींची नावे घोषित करण्यात आली. मिस नवी मुंबईच्या दहाव्या पर्वाची अंतिम स्पर्धा 27 फेब्रुवारी 2021 रोजी फोर पाईंट येथेच संपन्न होणार आहे. शेकडो मुलींमधून या सोळा जणी निवडणे अंत्यत कठिण होंते. याकरिता आमच्या तज्ञ टीमने रात्रंदिवस मेहनत घेऊन त्यांना अंतिम फेरीकरता सज्ज केले आहे. त्यात कोणतीही कसूर ठेवली नसल्याचे यावेळी यु अँड आय एन्टरटेन्टमेंटचे सर्वेसर्वा व स्पर्धेचे आयोजक हरमीत सिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी फोर पॉईंटचे संचालक राहुल बनसोडे, डॉक्टर संजीव कुमार, उद्योजक अशोक मेहरा, डॉक्टर वंदना जैन उपस्थित होते. 

अंतिम स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धेकांना रॅम्पवॉकचे प्रशिक्षण स्मृती भतिजा देणार आहे. यापुर्वी तिने मिस इंडिया 2019 च्या स्पर्धकांना प्रशिक्षण दिले होते. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास ही गोष्ट या स्पर्धेच्या अनुषंगाने खूप महत्वाची असते. त्यामुळे मानसोपचार तज्ञ इंद्रप्रीत कौर गुप्ता स्पर्धकांना आपला आत्मविश्‍वास द्विगुणीत करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे आता यो सोळा जणींनपैकी कोण ठरणार मिस नवी मुंबई 2021 याची उत्सकता नवी मुंबईकरांना लागली आहे. 

निवड झालेल्या 16 सौंर्द्यवती
ऐश्‍वर्या नायडु, आंषिका अग्रवाल, अपर्णा पाठक, गौरी गोठणकर, हर्षदा माळी, हर्षिता पुजारी, जान्हवी कदम, पायल रोहेरा, पुजा पुजारी, प्रिया चव्हाण, संयुक्ता पावस्कर, श्रुती अहिर, सिस्मिता पुजारी, सृष्टी बन्नाटी, उर्जिता मोरे, योगिता राठोड