प्रॉपर्टी विक्रीसाठी कागेचा मोबाईल ऍप

पहिल्यांदाच ऍपवर घरांची खरेदी विक्री 

नवी मुंबई : कोरोना महामारीत बांधकाम व्यवसायावर झालेल्या परिणामामुळे रिअल इस्टेट मधिल स्थावर मालमत्ता विक्रीमध्ये झालेली घट लक्षात घेऊन कागेद्वारा भारताचा पहिला गेमिफाईड रिअल्टी विक्री प्रदर्शन मोबाईल ऍपवर प्रदर्शित केला जाणार आहे. कागेचा ऑनलाईन प्रॉपर्टी फ्लॅश सेल विकासक व खरेदीदार यांच्यासाठी एक आशेचा किरण ठरेल असे मत कागेच्या सहसंस्थापक स्वप्ना मोरे यांनी सांगितले. चार राज्यातील दहा हजारांहून अधिक स्थावर संपत्तीची यादी या ऍपवर असून घर खरेदीदारांना सर्वोत्तम किंमतीत आपले स्वप्नवत घर खरेदी करण्याची संधी कागेने उपलब्ध करुन दिल्याचे त्या म्हणाल्या.  

कागे हे भारतातील पाहिले स्वयंचलित तांत्रिक गेमिफाइड ऑनलाईन रियल्टी फ्लॅश सेल हा एक सक्षम फ्लॅटफॉर्म आहे. करोना आपत्तीमुळे संपुर्ण उद्योग व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम स्थावर मालमत्ता खरेदी व विक्रीवर झाला आहे. त्यामुळे कागेने स्थावर मालमत्ता विक्रीचा एक सक्षम फ्लॅटफॉर्म या ऍपद्वारे उपलब्ध करुन दिला आहे. या मोबाईल ऍपद्वारे ग्राहकांची प्रत्येक गरज लक्षात घेऊन आणि ती पुर्ण करण्याच्या दृष्टीतून प्रत्येक ग्राहकांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला जात असुन त्यामुळे मरगळ आलेल्या रियल इस्टेट मार्केटला नक्कीच चालना मिळेल असा विश्वास स्वप्ना मोरे यांनी व्यक्त केला.  कागेने भारतात पहिला मोबाईल ऍप तयार केला असुन त्याद्वारे महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, एनसीआर आणि तेलंगणा येथे असलेल्या मालमत्तांची फ्लॅश विक्री सुरू करण्यात आली आहे. कागे ऍपच्या माध्यमातून विकासक आणि बँकर्स यामध्ये होणारे व्यवहार सक्षम, पारदर्शक व गतिशील होऊन गुंतवणूकदार आणि खरेदीदार यांना योग्य किंमतीत प्रॉपर्टी मिळावी हा उद्देश असल्याचे स्वप्ना मोरे यांनी सांगितले.

21 वे शतक नाविन्यपुर्ण असल्याने रिअल इस्टेट विक्रीच्या प्रक्रियेत डिजिटल क्रांती घडविण्याचा कागेचा प्रयत्न असल्याचे कागेचे सीईओ तुषार देसाई यांनी सांगितले. कागे ही संस्था आयएसओ 9000:2015 आणि रेरा प्रमाणित कंपनी आहे. तसेच स्टार्ट अप इंडियात देखील नोंदणीकृत असल्याचे ते म्हणाले. कागेने यापूर्वी 2019 मध्ये मुंबईतील एका विकासकासाठी पहिले प्रॉपर्टी ड्रॉ प्रदर्शित केले होते. त्यामध्ये 49 कोटी किंमती मालमत्तेची 196 घरांची नोंदणी ग्राहकांनी केली होती.