बेलापूर किल्ल्यावर शिवजयंती उत्साहात

नवी मुंबई ः युगनिर्माते प्रतिष्ठान व किल्ले बेलापूर कृती समितीच्या वतीने नवी मुंबईतील एकमेव किल्ला किल्ले बेलापूर येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. नवी मुंबईला लाभलेलं भाग्य म्हणजे एकमेव किल्ला व ऐतिहासिक स्थळ किल्ले बेलापूर येथे शिवजयंती साजरी करण्याचे यंदाचे हे तृतीय वर्ष होते. 

शिवजयंती उत्सव हा गडावर घेण्याचा मूळ उद्देश म्हणजे लोकांना किल्ला माहित होणे हा होता. या शिवजयंती उत्सवाची सुरुवात किल्ल्यावर ज्योत प्रज्वलन करून करण्यात आली. त्याचसोबत शिवदिंडी पालखी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. या शिवदिंडी पालखीच्या माध्यमातून शिवविचार लोकांमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न केला. तसेच गेल्यावर्षी महाराष्ट्रावर देखील कोरोनाचे संकट आल्याकरणाने या संकट काळात अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड योद्धा म्हणून कार्य केले आणि म्हणून सन्मान आधुनिक मावळ्यांचा, कोविड योद्ध्यांची या संकल्पना अंतर्गत स्वच्छता कर्मचारी, वॉर्ड विभागातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी, आरोग्य अधीक्षक व कर्मचारी, अनेक समाजसेवक तथा नगरसेवक यांनी आपलं सामाजिक भान ठेवत कोविड काळात जे कार्य केले त्यासाठी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.  

यादरम्यान सध्या गेले 2 वर्ष किल्ले बेलापूर संवर्धनाकरिता जे सुशोभीकरणाचे काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या किल्ल्याकडे अजूनही दुर्लक्ष होत असल्याकारणाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व प्रेक्षक वर्गाच्या साक्षीने या किल्ल्यासाठी काम करण्यासाठी किल्ले बेलापूर कृती समिती या चळवळ तथा संस्थेचे उदघाटन करण्यात आले. शिवजयंती उत्सव 2021 यावेळी कृती समितीचे अध्यक्ष मनोज भोईर व युगनिर्माते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर वसमाने यांनी सर्व उपस्थित गावकर्‍यांना संबोधित करताना असे सांगितले कि, नवी मुंबईतील एकमेव किल्ला असल्या कारणाने यास पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्याचा प्रस्ताव सरकार पर्यंत पोहचवण्यात येईल व किल्ल्यातील स्थानिक रहिवाशांचा पुनर्वसनाच्या प्रश्नावर देखीलचर्चा करण्यात आली, लवकरच यावर सरकारसोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच किल्ल्याचा व गावकर्‍यांचा प्रश्नांना मार्गी लावण्याचा प्रतिष्ठान नक्कीच प्रयत्न करेल. त्याचसोबत राजेंद्र सोनवणे यांचा माध्यमातून सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. 

याप्रसंगी रवींद्र पाटील, व. पो. नि., एन. आर.आय. पोलीस स्टेशन, बेलापूर, नगरसेविका नेत्रा शिर्के व पुनम पाटील, नगरसेवक दीपक पवार, शिवदास कोळी, समाजसेवक नारायण मुकादम, समाजसेवक ज्ञानेशवर कोळी, समाजसेवक बाळकृष्ण बंदरे, राजेंद्र सोनवणे- मुख्य स्वच्छता अधिकारी, न.मुं.म.पा., रावसाहेब पोटे, आरोग्य अधीक्षक, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम पार पाडण्यास खारीचा वाटा उचलणारे कृती समितीचे प्रतिनिधी संतोष गोळे, योगेश घरत, प्रथमेश दळवी, सौरभ बालम, अजय बांदेकर, अजिंक्य नवले, प्रसाद घरत, उत्तम धायगुडे, मनोज बालम, शामराव धायगुडे आदी सर्वांनीच खारीचा वाट उचलला. तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अक्षय चव्हाण, सचिव प्रणेश भुवड, सरचिटणीस सौरभ आहेर, खजिनदार सुदर्शन कौदरे, विशाल पिंगळे, विशाल लोकरे, विशाल पोखरकर, आकाश भवल इ. पदाधिकारी व सदस्यांनी अधिक मेहनत घेतली.