राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत रिया चौधरीचा तिसरा क्रमांक

पनवेल : अलिबाग येथे 20 फेब्रुवारी रोजी फ्रायडे फिल्म्स अलिबाग आयोजित विजयश्री 2021 या राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कळंबोली येथील कु. रिया राजेंद्र चौधरी हिने आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवत तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे. 

ज्या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातील अनेक दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला होता, अशा स्पर्धेत कळंबोली येथील रिया राजेंद्र चौधरी हिने आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली. तृतीय क्रमांक पटकावून रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिनह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर स्पर्धेचे परिक्षण ज्येष्ठ सिने अभिनेत्री वर्षा दारंडे आणि अभिनेता ग. म. खेडेकर यांनी केले. रियाने या स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल तिच्यावर समाजातील सर्वच थरातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.