28 फेब्रुवारीला होणारे सायक्लोथॉन रद्द

नवी मुंबई ः ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा तसेच सायकलसारख्या इंधनविरहित पर्यावरणपूरक वाहनाचा वापर वाढवून प्रदूषणाला प्रतिबंध घालण्याचा संदेश प्रसारित करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई सायक्लोथॉन 2021 चे आयोजन करण्यात आले होते. मात्र सध्याचा कोव्हीड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही कालावधीकरिता पुढे ढकलण्यात आलेली आहे. सदर सायक्लोथॉन 28 फेब्रुवारी रोजी होणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत सूचित करण्यात आले आहे.