दोन दिवसांत साडेबारा हजारांचा दंड वसूल

मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

तळोजा : सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. याला अटकाव घालण्यासाठी कोरोनाविषय नियमांचे पालन करणे अनिर्वाय आहे. पालिका आयुक्तांनी याविषयी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार नियम उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. दोन दिवसात तळोजा 1 मधून मास्क न घालणार्‍यांकडून 12500 रूपये एवढा दंड वसूल करण्यात आला. 

पनवेल महापालिका क्षेत्रात आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मास्क न वापरणार्‍यांना 500 रूपयांचा दंड आकारण्याचे आदेश प्रभाग समिती अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार तळोजा फेज-1 मध्ये दोन दिवसांत (22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी) एकूण 12500 रूपये एवढा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईसाठी स्वच्छता निरीक्षक योगेश कस्तूरे, दिपक सिलकन, यांच्यासह पोलिस अधिकारी संदेश उतेकर, विजय पाटिल पोलिस अधिकारी तसेच पर्यवेक्षक नितीन बले, वसीम पटेल आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.