दिवगंत पोलिसांच्या वारसांना नियुक्ती पत्र

नवी मुंबई ः कोरोनाच्या व इतर सेवा काळात दिवंगत झालेल्या पोलिसांच्या पाल्यांना पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई व कोकण परिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुकंपा तत्वावर भरती होण्यासाठी नियुक्ती पत्र देण्यात आली. यात समावेश आहे. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मंगळवारी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते 83 पोलीसांच्या वारसांचा नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. 

पोलीस  दलातील अनुकंपा तत्वावर होणारी भरती अनेक वर्षापासून रखडली आहे. मात्र कोरोना महामारीत ज्या पोलीस कर्मचार्‍यांनी आपले प्राण गमविले, त्यांच्या वारसांना तातडीने पोलीस सेवेत सामावून घ्या अशा सूचना पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केल्या होत्या. त्यानूसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 19 तर कोकण परिक्षेत्रातील 64 पोलीस कर्मचारी अशा एकूण 83 पोलीस वारसांची यादी तयार अनुकंपा तत्वावर भरती होण्यासाठी त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली. या वारसांना मंगळवारी नियुक्तीपत्र देण्यात आली. याप्रसंगी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग, पोलीस उपमहानिरिक्षक संजय मोहिते, सहपोलीस आयुक्त बी.जी. शेखर पाटील, जय जाधव, पोलीस अधिक्षक अशोक दुधे, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.