प्रारूप मतदार यादीवर 3497 हरकती

नवी मुंबई ः राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मतदार यादी कार्यक्रमानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने 16 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे.या प्रसिद्ध झालेल्या यादीवर नागरिकांच्या एकूण 3497 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोग यांचे 02 फेब्रुवारीच्या पत्रान्वये नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2021 मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने 16 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. या मतदार यादीवर 16 ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांच्या एकूण 3497 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. यानुसार आता प्रभागनिहाय मतदार यादी 3 मार्च रोजी अंतिम होणार आहे. गेल्या वर्षीही ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी प्रारूप मतदार यादीवर सुमारे अडीच हजार तक्रार आल्या होत्या. यावर्षी यात दुपटीने वाढ झाल्याचे दिसत आहे.

अक्र.     विभागाचे नाव एकूण हरकती /सूचना
1     दिघा विभाग                          129
2     ऐरोली विभाग                       1108
3     घणसोली विभाग                     395
4     कोपरखैरणे विभाग                 420
5     वाशी विभाग                          566
6     तुर्भे विभाग                           393
7     नेरूळ विभाग                       155
8     बेलापूर विभाग                     161
9 निवडणूक विभाग मुख्यालय     170
एकूण  3497