मनसेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी

नवी मुंबई ः वीजबिल न भरल्याने महावितरणने वीज खंडित केल्याचा राग धरुन महावितरण केंद्राच्या नेरुळ कार्यालयाची तोडफोड करणार्‍या मनसे कार्यकर्त्यांना वाशी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. 

राज्यात महावितरणच्या विविध कार्यालयात ज्या ग्राहकांनी लॉकडाऊनमुळे एप्रिल 2020 ते जानेवरी 2020 या 10 महिन्यात वीजबिलापोटी एकदा ही वीजबिल भरलेले नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सध्या सुरु आहे. नरेश कुंभार यांच्या घराचे वीजबिल 11 महिन्यापासून थकीत असल्याने 17 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी नेरुळ येथील महावितरण कार्यालयातील अधिकार्‍यांना धक्काबुक्की, दमदाटी करून कार्यालयातील टेबल, दारांवरचे काचा फोडल्या. याबद्दल, नेरुळ पोलीसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली असता आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सूनावली.