Breaking News
दहाव्या पर्वाचा अंतिम सोहळा उत्साहात संपन्न
नवी मुंबई ः मिस नवी मुंबईच्या दहाव्या पर्वाचा अंतिम सोहळा शनिवारी वाशी येथील फोर पॉईंट हॉटेल मध्ये कोविड विषयक खबरदारी घेत मोठ्या थाटात संपन्न झाला. या वेळी सोळा सौंदर्यवतीनी आपल्या दिलखेच अदानी परीक्षक व प्रेक्षकांना मोहून टाकले. वेगवेगळ्या तीन फेर्या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी मुंबई 2021 चा ताज योगिता राठोड या सोंदर्यवतीने पटकावला. सोबतच दुसर्या व तिसर्या जागेवर अनुक्रमे पायल रोहेरा व अपर्णा पाठक हिने बाजी मारली.
परीक्षक म्हणून लिव्हा मिस दिवा सुपरनॅशनल 2020 ची विजेती अवृत्ती चौधरी,मिस आईशिया इंडिया 2018 ची विजेती सिमरण मल्होत्रा, मिसेस इंडिया ब्युटी क्विनची विजेती व अभिनेत्री डॉ. इलाक्षी मोरे, संजीव कुमार, अशोक मेहरा यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावली. या स्पर्धेचे हे दहावे पर्व होते कोविड मुळे सर्व खबरदार्या घेत आम्ही या स्पर्धेला खंड पडू दिला नाही. पुढच्या वर्षी आम्ही नवी मुंबईकरांना आगळावेगळा सोहळा अनुभवास देऊ. या वर्षी शेकडो मुलींनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदविला आणि यापैकी सर्वच फेरीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या सोळा सौंदर्यवती अंतिम फेरीत गेल्यात. या माध्यमातून आम्ही सामान्य घरातील मुलींना एक व्यासपीठ निर्माण करून देत आहोत ज्या माध्यमातून मनोरंजन व फॅशन क्षेत्रात आमचे स्पर्धक या पूर्वी चमकलेत अशी माहिती आयोजक यू अँड आय एन्टरटेन्टमेंट चे हरमीत सिंग यांनी दिली. मनमित सिंग यांच्या संन्यास या बँड ने आपल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
ज्या सोळा सौंदर्यवतींची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती त्यांना रॅम्पवॉकचे प्रशिक्षण स्मृती भतिजा हिने दिले. यापूर्वी तिने मिस इंडिया 2019 च्या स्पर्धकांना प्रशिक्षण दिले होते. त्याचबरोबर मानसोपचार तज्ञ इंद्रप्रीत कौर गुप्ता यांनी स्पर्धकांना आपला आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी प्रशिक्षित केले. तिन्ही वेगवेगळ्या फेरीत रिचा हावरे (राजकुमारी) नीता शर्मा (फॉरेव्हर प्रिटी ) आणि जेडी इन्स्टिटयूट ऑफ फॅशन वाशी अँड घाटकोपर यांनी डिझाईन केलेले ऑउटफिट परिधान करून रॅम्पवॉक केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा शेट्टी सेलेब्रिटी होस्ट हिने केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai