जेएनपीटीमध्ये डबल स्टॅकड् ड्वार्फ कंटेनरट्रेनची यशस्वी चाचणी

ग्राहकांना होणार लाभ ; रेल्वे वाहतूकीमध्ये होणार वाढ

उरण : गुजरातमधील मेहसाणा ते जेएनपीटी बंदरापर्यंत डबल स्टॅकड् ड्वार्फ कंटेनरट्रेनची 3 मार्च रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली. डबल स्टॅकड्ड्वार्फ कंटेनरच्या पाच वॅगनसह ट्रेन सकाळी 11:30 वाजता जेएनपीटी बंदरात दाखल झाली व दुपारी एक वाजता परत रवाना झाली. 

ड्वार्फ कंटेनर एकावर एक ठेवून माल वाहतूक केल्याने 67% अधिक मालाची वाहतूक केली जाते. तसेच 40 टनक्षमतेच्या आयएसओ कंटेनरच्या तुलनेत ड्वार्फ कंटेनरमधून 71 टन मालाची वाहतूक केली जाऊ शकते. त्याचबरोबर भारतीय रेल्वेद्वारा आयएसओ कंटेनर गाड्यांच्या तुलनेत डबल स्टॅकड् ड्वार्फ कंटेनर गाड्यांसाठी अतिरिक्त मालवाहतूकीसह मालवाहतूक शुल्कात 17% सवलत दिली गेली आहे. जेएनपीटी बंदरात डेडिकेटेड ड्वार्फ कंटेनर डेपोचे (डी-डेपो) व्यवस्थापन, देखभाल व संचालनकरण्यासाठी ऑपरेटरची नेमणुक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या डेपोमध्ये आयएस ओ एक्झिम कंटेनर डिस्टफ़्ड/रीस्टफ़्डकेले जातील आणि नंतर जेएनपीटीकडे किंवा जेएनपीटीतुन बाहेर रेल्वेने पाठवण्यासाठी ड्वार्फकंटेनरमध्ये पुन्हा रीस्टफ़्ड केले जातील.

ड्वॉर्फ कंटेनरची संकल्पना मालवाहतूक क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. कारण ड्वार्फ कंटेनर एकावर एक ठेवून आयात-निर्यात मालाची रेल्वेद्वारे वाहतूक केल्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच जेएनपीटीमध्ये ेरेल्वेच्या वाहतूकीमध्येसुद्धा वाढ होणार आहे.