एपीएमसीतील सफाई कामगारांना दिलासा

नवी मुंबई ः एपीएमसी बाजार समितीतील कंत्राटी सफाई व माळी कामगारांना लॉकडाऊन काळातील विशेष भत्ता मार्च महिन्यातील वेतनात देण्याचे संकेत मिळाल्याने या कामगारांना दिलासा मिळाला आहे. तसेच येत्या संचालक बैठकीत पगार वाढीविषयी चर्चा करणार असल्याचे बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी सांगितले.

एपीएमसी बाजार समितीमधील सफाई कामगारांचे मागील तीन वर्षांपासून पगार वाढ न झाल्याने कामगारांच्या या प्रश्‍नासंदर्भात रिपब्लिकन कामगार सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी बाजार समितीचे सभापती अशोकराव डक यांच्याशी चर्चा केली. यावेळी मार्च महिन्याच्या वेतनात कोरोना काळातील विशेषभत्ता देण्यात येईल तसेच ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगितले. यासाठी बाजार समितीचे अधिकारी व कामगार प्रतिनिधी एकत्र चर्चा करुन आराखडा तयार करतील असे डक यांनी सांगितले. लॉकडॉऊन काळतील सफाई कामगारांना प्रत्येकी महिना 5 हजार रुपये देण्याची मागणी आनंदराज यांनी केली. हा विषय येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल असे सभापती यांनी सांगीतले. या बैठकीत नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष खाजामिया पटेल, सतीश शिंगरे बाजार समिती युनिट अध्यक्ष, भिमराव गवई बाजार समिती युनिट सचिव, भूषण कासारे कामगार प्रतिनिधी, नंदकुमार भालेराव उपध्यक्ष नवी मुंबई, प्रकाश वानखेडे अयरोली विधानसभा अध्यक्ष, समता सैनिक दल चे सईनिक, सुनील वानखेडे युवासेना अध्यक्ष, व कांदा बटाटा मार्केट, फळ मार्केट, भाजी मार्केट, मसाला मार्केट, दाना मार्केटचे सफाई कामगार, माळी कामगार उपस्थीत होते.