मनामध्ये भिती न बाळगता सर्वांनी कोरोना लस घ्यावी

विजय चौगुले यांचे नागरिकांना आवाहन 

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र शासनाच्या वडार समाज समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी सोमवारी ऐरोली येथील इंद्रावती रुग्णालयात कोरोनाची लस  घेतली. मनामध्ये कोणतीही भिती न बाळगता सर्वांनी कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोरोनाच्या लसीकरणाचा तिसरा टप्पा आता सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल स्टाप यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यामध्ये पोलीस, पालिका कर्मचारी आणि अन्य शासकीय कर्मचार्‍यांना लस देण्यात आली. आता 3 मार्चपासून तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेंतर्गत माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी ऐरोली येथील इंद्रावती रुग्णालयात कोरोनाच्या लसीचा डोस घेतला.

शिवसेनेचे सुविधा केंद्र
ऐरोलीतील झोपडपट्टी भागातील 45 ते 60 वर्षे वयोगटामधील नागरिकांना कोरोनाची लस जर खाजगी रुग्णालयातून घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी शिवसेना ऐरोली शाखा आणि ममित चौगुले फाऊन्डेशन यांच्या माध्यमातून सुविधा केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून लस घेणार्‍या नागरिकांना पूर्ण सहकार्य केले जाणार आहे, असे विजय चौगुले यांनी यावेळी सांगितले.