खारघरमध्ये पहिले ब्ल्यू डार्ट ऑल वुमन सर्विस सेंटर सुरु

मुंबई : ब्ल्यू डार्ट या दक्षिण आशियातील प्रीमिअर एक्स्प्रेस हवाई आणि एकात्मिक दळणवळण आणि वितरण कंपनीने सर्व उद्योग विभागांमध्ये आघाडीचे स्थान प्रस्थापित केले आहे. त्यांचे मनुष्यबळ, तंत्रज्ञान तसेच हवाई आणि जमिनीवरील एक्स्प्रेस नेटवर्क ज्यामुळे ग्राहकांना प्रीमिअम अनुभव मिळतो अशा सर्व बाबींमुळे हे बाजारपेठेतील नेतृत्व स्थान मिळाले आहे. बहुविधता आणि सर्वसमावेशकतेतही आघाडी घेत या कंपनीने आपले पहिले ब्ल्यू डार्ट ऑल वुमन सर्विस सेंटर सुरू केले आहे. 

अनेक वर्षांपासून लॉजिस्टिक उद्योग एका ठराविक साच्यात, पुरुषांचे वर्चस्व असल्याप्रमाणे चालत आहे. मात्र, या उद्योगातील हा दृष्टिकोन बदलण्यासाठी ब्ल्यू डार्ट आपल्या स्थापनेपासून म्हणजे अगदी 1983 पासून लक्षणीय प्रयत्न करत आहे. क्षमता असलेल्या महिलांना कंपनीने वरिष्ठ नेतृत्वाच्या जागा घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी ब्ल्यू डार्ट म्हणजे लॉजिस्टिक उद्योगात लिंगसमावेशकता जपणारी कंपनी कशी असते याचे उत्तम उदाहरण आहे. नवी मुंबईतील खारघर येथे असलेल्या ब्ल्यू डार्टच्या सर्व्हिस सेंटरमध्ये सोळा उत्साही महिलांची टीम आहे. या महिला व्यवस्थापक, कस्टमर सर्विस रीप्रेझेंटेटिव्ह, सेक्युरिटी पर्सनल तसेच सेल्स आणि काऊंटर स्टाफ अशा विविध जबाबदार्‍या सांभाळत आहेत. ही दमदार टीम ग्राहकांना ब्ल्यू डार्टची ओळख असलेली अतुलनीय दर्जेदार सेवा देतील. याचबरोबर ही कंपनी बहुविधता आणि सर्वसमावेशकतेचा हा उपक्रम आणखी पुढे नेत आहे. ‘एम्प्लॉयर ऑफ चॉईस’ या उपक्रमातून अधिकाधिक महिलांना ब्ल्यू डार्ट कुटुंबात समाविष्ट केले जाणार आहे आणि लवकरच खारघरच्या ऑल महिला सर्विस सेंटरप्रमाणेच अंधेरी येथे आणखी एक केंद्र सुरू केले जाणार आहे. अंधेरी सर्विस सेंटरमध्ये एकूण मनुष्यबळापैकी 70 टक्के महिला असतील.  

ऑल महिला सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन करताना ब्ल्यू डार्टचे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफोर मॅन्युअल म्हणाले, आमच्या व्यवसायात महत्त्वाच्या असलेल्या ‘माणसे प्रथम तत्वज्ञाना’नुसार आमचे सर्व कर्मचारी-लिंग, वय, जात, धर्म असा कोणताही भेदभाव न बाळगता- हेच आमच्या संस्थेत प्राधान्यक्रमावर आहेत. ब्ल्यू डार्ट नेहमीच समान संधी देणारी कंपनी राहिली आहे. महिला कर्मचार्‍यांना त्यांची कामे स्वतंत्रपणे करण्यास आम्ही नेहमीच पाठबळ आणि प्रोत्साहन दिले. त्यांच्या सहभागामुळे ब्ल्यू डार्ट भारतात गोल्ड स्टँडर्ड ऑफ एक्स्प्रेस लॉजिस्टिक हा दर्जा मिळवू शकली. महिला कुरिअर्स ते आमच्या वरिष्ठ नेतृत्व टीममधील ब्ल्यू डार्ट एव्हिएशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर तुलसी मिरचंदानी आणि आमच्या नॅशनल कस्टमर सर्विस हेड सोनिया नायर, महिलांनी ब्ल्यू डार्टला वर्षानुवर्षे नवे मापदंड स्थापित करण्यास, ते गाठण्यात साह्य केले आहे, त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या अनेकांसाठी, अगदी माझ्यासाठीही प्रेरणास्थान आहेत.