साईकला बहुद्देशीय संस्थेतर्फे महिला कोरोना योद्धांचा सन्मान

नाशिक ः साईकला बहुद्देशीय संस्था, धुळे तर्फे महिला दिनानिमित्त नाशिक येथे कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मिस इंडिया परफेक्ट 2021 दीपाली कांबळे, सरकारी वकील संध्या वाघचौरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

कोरोना काळात महिलांनीही स्वतःला झोकून देऊन सामाजिक बांधिलकी जपत कामाचा प्रवाह सुरुच ठेवला. डॉ.गौरी लभडे आणि पो. गीता रहाण यांनी कोरोनाकाळात केलेल्या कार्याबद्दल कोरोना योद्धां म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी दीपाली कांबळे यांनी त्यांच्या कलाक्षेत्राच्या सुरवातीपासून ते मिस इंडिया परफेक्ट होईपर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना सांगितला. तसेच, कलाक्षेत्रातील मनोरंजन हे माध्यम फक्त मनोरंजनापूरतेच ठेवून, त्याला दैनंदिन जीवनात आणू नका असे मत स्पष्ट केले. तसेच आजच्या कोरोना काळातील महिलांनी कशाप्रकारे सामोरे गेले व त्यांचे कौतुक केले. डॉ.गौरी लभडे यांनी कोरोना काळात कसे सहकार्य केले हे सांगितले व स्त्रीने आपले आरोग्य कसे सांभाळावे? या वरून प्रेक्षकांकडून मनातील शंका जाणून घेतल्या. पो. गीता रहाणे यांनीसुद्धा कोरोना काळात कसे सहकार्य केले व कसे नाशिक शहराला आवाहन केले हे सांगितले. तसेच मुलींनी कसे सक्षम राहिले पाहिजे हे याविषयावर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे, संस्थेचा आराखडा व महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.