Breaking News
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने ठाणे ते वाशी सेक्टर 7 या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशां साठी वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गावर इलेक्ट्रिक सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ही मागणी पुर्ण झाली असून काल मंगळवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही बससेवा सुरू झाली असून साध्या दरामध्ये या पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक व वातानुकूलित बसचा आनंद प्रवाशांना घेता येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यामध्ये पर्यावरण दाखल झाल्या आहेत. या बसेस कोपरखैरणे वाशी मार्गावर चालविण्यात येत होत्या परंतु ठाणे दिघा ऐरोली परिसरात या बसेस सुरू करण्यात न आल्याने प्रवाशांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. नुकत्याच नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसेस ठाणे वाशी मार्गावर सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यानुसार परिवहन व्यवस्थापनाने बस मार्ग क्रमांक 4 ठाणे ते वाशी सेक्टर 7 या मार्गावर इलेक्ट्रिक वातानुकूलित बससेवा सुरू केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai