पालिका क्षेत्रात 10 अनधिकृत शाळा

नवी मुंबई ः 30 जानेवारी, 2021 अखेर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात खालील 10 प्राथमिक शाळा शासनाची किंवा नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांत प्रवेश न घेण्याचे तसेच प्रवेश घेतला असेल तर तो रद्द करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. 

आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. तरी संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी. तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. 

  • इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट अल मोमिना स्कुल, सेक्टर-8बी, आर्टिस्ट व्हिलेज, सी.बी.डी. बेलापूर इंग्रजी
  • ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, अग्रीपाडा, मुंबई इकरा इंटरनॅशनल स्कुल, सेक्टर-27, नेरूळ इंग्रजी
  • द आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल (उइडए), सीवुड, सेक्टर-40, नेरूळ. इंग्रजी
  • वर्ल्ड एज्युकेशनल ट्रस्टचे नवी मुंबई ख्रिश्चन इंग्लिश स्कुल, तुर्भेस्टोअर्स इंग्रजी
  • उज्वला फाऊंडेशन, वाशी रोज बड्स स्कुल, तुर्भेस्टोअर्स, नवी मुंबई. इंग्रजी
  • ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ, किसान न. 3 ठाणे सरस्वती विद्यानिकेतन स्कुल, सेक्टर-5, घणसोली इंग्रजी (न्यायप्रविष्ठ प्रकरण)
  • गॅलरी एज्युकेशन अ‍ॅण्ड व्हेल्फेर सोसायटी अचिएवर्स वर्ल्ड प्रायमरी स्कुल, सेक्टर-1, घणसोली इंग्रजी
  • अल मेझान एज्युकेन सोसायटी इम्पाईसीस इंग्रजी स्कुल, सेक्टर-2, घणसोली. इंग्रजी
  • अविनाश विद्या केंद्र ट्रस्ट, ब्लोसोम स्कुल, घणसोली गांव, नवी मुंबई. इंग्रजी
  • इलिम फुल गोस्पेल ट्रस्ट, ऐरोली इलिम इंग्लिश स्कुल, आंबेडकर नगर, रबाले इंग्रजी