योगाभ्यास आणि तणावमुक्ती 4

 तणावमुक्तीसाठी साक्षीभावना हा प्रकार आपण अभ्यास केला आज ओंकार साधना करुन तणावमुक्ती कशी करायची हे पाहू ओंकार हा तीन अक्षरी शब्द आहे. त्याला नादब्रम्ह असे म्हणतात. ॐकार उच्चरण करताना जीभेचा संबंध येत नाही. ॐकार ही अक्षर मुर्ती आहे. महर्षि पंताजलीनी म्हटलं आहे ‘तस्य वाचक प्रणवः’ प्रणवः म्हणजे ॐकार म्हणजेच ईश्‍वाराचे स्वरुप. पण त्याचा अभ्यास कसा करायचा तर तद जप तदर्थ भावनेने. आपम संपुर्ण चित्त तिथे ठेवून त्याचे ध्यान करावे.

 आता आपण तणावमुक्तीसाठी ओंकार ध्यान कसे करायचे हे पाहू. याचे दोन प्रकार आहेत.

 1) ओकांरचे उच्चारण कराना ओं चे उच्चारण 1/3 करायचे व म म्हणजे ज्यावेळी ओठ बंद होतात व संपुर्ण चेहर्‍यावर व शरिरामध्ये कंपन चालू होतात तो भाग 2/3 करायचा. असे कमीतकमी 7 वेळा उच्चारण करायचे. कोणत्याही बैठक स्थितीमध्ये बसावे, पाठ नैसर्गिकरित्या सरळ असावी. वेळ सकाळी पहाटे किंवा संध्याकाळी. मनाची एकाग्रता नासिकेतून निर्माण होणार्‍या नादावर असावी. 7 वेळा अशी तीन ते चार सुरुवातीला आवर्तने करावीत. हळूहळू आवर्तने वाढवावीत. आवर्तने पुर्ण झाल्यावर मन श्‍वासावर ठेवून थोडावेळ शवासन करावे.  

ओंकार साधना करताना येणार्‍या अडचणी

मन पुर्णपणे तणावाने भरले असताना मन ओंकाराच्या नादावर एकाग्र होत नाही अशावेळा आवर्तने कमी करावी उच्चारण कमी करावे थोडा तणाव कमी झाल्यावर उच्चारण संख्या व आवर्तने वाढवावीत. 

प्रकार 2 

कोणत्याही बैठक स्थितीमध्ये बसावे अथवा खुर्चीवर बसावे. पाठीचा कणा नैसर्गिक ताठ ठेवावा. अथवा झोपून सुद्धा करु शकता. पण मानसिक तणाव पुर्णपणे बाजूला ठेवावा लागेल आणि शरिारचे संपुर्ण अवयव शिथील ठेवायचे. 

 कृति 

 पुर्ण श्‍वास आतमध्ये घ्या आणि श्‍वास बाहेर सोडताना ओम, ओम असे एका श्‍वासामध्ये शक्य असेल तेवढे उच्चारण करायचे. परत दिर्घ श्‍वास घ्यायचा आणि परत तसेच ओम ओम श्‍वास संपेपर्यंत उच्चारण करायचे. मनाला पुर्णपणे श्‍वासावर आणि ओंकाराच्या नादावर केंद्रिंत करायचे. सुरुवातीला पाच ते सात श्‍वास असे एक अशी तीन ते चार आवर्तने करावीत. हळूहळू आवर्तने वाढवत जावीत. रोज पहाटे आणि झोपायच्या आधी 10 मिनीटे तरी अभ्यास करावा. 

अभ्यास झाल्यानंतर डोळे मिटून पाच मिनीटे शांत बसावे. ज्यांना सर्दीचा त्रास असेल त्यांनी हळूवार जमेल च्याप्रमाणे उच्चारण करावे. नाहीतर नासिका मार्ग शुद्ध करावा व अभ्यास करावा. 

ओंकार साधनेपासून होणारे फायदे

  •  मन शांति मिळते
  •  तणावामुळे होणारी डोकेदुखी थांबते
  •  हार्मोनल बॅलेन्स होतो.
  •   मनातील आतल्या कप्यात साठून राहीलेले तणाव र्निाण करणारे विचार एकएक बाहेर पडल्यामुळे मन हलके होते.
  •  श्‍वास प्रश्‍वास क्रिया सुधारते.
  •  मनावरचा ताण तणाव कमी होतो.
  •  रक्तदाबाचा आजार कमी होतो.
  •  मनाची दुर्बलता कमी होतो व मन खंबीर होते.
  •  निद्रानाशाचा विचार कमी होतो. व झोप शांत लागते.
  •  बद्कोष्ठता पोटाचे विकार असे मनोकायिक आजार कमी होताता.