सिडको हटाव जमीन बचाव.....

नवी मुंबई ः 17 मार्च 1970 रोजी सिडको महामंडळाची स्थापना झाली. सिडको स्थापना दिवस हा येथील सर्व भुमीपुत्रांच्या आयुष्यातील काळा दिवस आहे. गेले 51 वर्षात सर्व भूमिपुत्र आपल्या न्याय्य मागण्यासाठी सातत्याने संघर्ष करीत आहे. परंतु अजूनही प्रकल्पग्रस्त भुमीपुत्रांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यांच्यावर अन्याय करणारे सिडको महामंडळ बरखास्त करा अशी सर्व मागणी भूमिपुत्रांनी शासनाकडे केली आहे. सिडको बाधित 95 गावांतील भूमिपुत्र, नैना प्रकल्प, एस.ई.झेड, जे.एन.पी.टी.,विरार अलिबाग कॉरिडोर, विमानतळ बाधित शेतकरी व मच्छीमार, एम.आय.डी.सी., लॉजिस्टिक्स पार्क या सर्वांनी आज काळा दिवस पाळून सिडकोचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. आपापल्या गावात हे सर्व प्रकल्पबाधित एकत्र येऊन हातात फलक घेऊन सिडकोविरोधातील आपला रोष व्यक्त करत आहेत.