गुरुवारी सिडकोतर्फे पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई ः सिडकोतर्फे हेटवणे पाणी पुरवठा योजने अंतर्गत दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेतल्यामुळे खारघर, तळोजा, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटी वसाहात, जेएनपीटी बंदर व आजुबाजूची गावे या भागातील पाणी पुरवठा गुरूवार 25 मार्च 2021 रोजी सकाळी 9.00 पासुन ते शुक्रवार 26 मार्च 2021 पर्यंत सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहाणार आहे.

हे दुरूस्तीचे काम झाल्यानंतरही पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. प्रभावित परिसरातील नागरिकांनी यापुर्वीच पाण्याचा साठा करून, या दरम्यान पाण्याचा जपुन वापर करावा असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.