सुभाष पुजारी यांची ‘‘भारत श्री 2021’’ किताबावरही मोहोर

आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड

पनवेल ः ‘‘मास्टर महाराष्ट्र श्री 2021’’ या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करुन ‘मास्टर भारत श्री 2021’ या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरिक्षक सुभाष पुजारी यांनी ‘‘भारत श्री 2021’’ किताबावर आपली मोहोर उमटवली आहे. ते आता आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतचे नेतृत्व करणार असल्याने पोलीस खात्यामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सुभाष पुजारी हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मास्टर भारत श्री 2021 खेळताना 80 किलो वजनी गटात सुभाष पुजारी यांनी गोल्ड मेडल पटकावले आहे. ही बाब महाराष्ट्र पोलीस खात्याची मान वाढविणारी आहे. त्यांच्या या यशाबददल पोलीस खात्यामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दि.01 ते 07 सप्टेंबर 2021 दरम्यान मालदीव येथे होणार्‍या आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी पुजारी भारतचे नेतृत्व करणार आहेत. राष्ट्रीय मास्टर एशिया श्री 2021 या बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये त्यांची निवड भारतीय संघातून झाली आहे.

पुजारी यांनी महामार्ग पोलीस विभागात मुंबई पुणे द्रुतगर्ती मार्गावर वरिष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी वेगवेगळी उपक्रम राबवून महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावण्याचे काम केले आहे. पोलीस सेवेत असलेले सुभाष पुजारी हे सामाजिक कार्यात सुद्धा पुढे असतात. कोल्हापुर येथे नैसर्गिक आपर्तीमुळे पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापुर वासियांचे जनजीवन विस्कळीत झाले होते अशा वेळी त्यांनी आपला समाजातील असलेला जनसंपर्क, मित्रमंडळी व महामार्ग पोलीस पळस्पे नवी मुंबई यांचेकडून कोल्हापुर येथील 600 कुटुंबियांना किमान 8 दिवस पुरेल इतका राशन पुरवठा केला होता.