पुष्पा घरत यांचे निधन

नवी मुंबई ः शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पत्नी पुष्पा घरत यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. बुधवारी खारघर येथील स्मशानभुमीत त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नवी मुंबईतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.

पुष्पा घरत या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना नुकतेच नेरुळ येथील आपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. उपचार सुरू असताना काल त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती शिरीष घरत, तीन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुष्पा घरत यांचा दशक्रिया विधी 2 एप्रिल रोजी नाशिक येथे होणार असून उत्तरकार्य 5 एप्रिल रोजी खारघर येथील राहत्या घरी पार पडणार आहे.