एक होडी

मीरा के बोल

दुर त्या किनारी वसे एक होडी
मस्तवाल अशी छोटी सुंदरी ती होडी
दिवसा शुभ्र लाटांवर ती डौलाने स्वार होई
रात्र नीजे शांत आपल्या किनार्‍यावरी
रोजचा हा दिनक्रम चाले असाच लागोपाठ
वर्ष आली वर्ष गेली होडी मात्र तीथेच झिजली
छोटा पल्ला पार करता आता दमते होडी
लाटांवर्ती स्वार होता आता भीते होडी
आयुष्यभर जे केले तेआता सहज जमत नाही
प्रयत्न करुन सुद्धा शरीर साथ देत नाही
शांत बसते मग एकटी ती होडी
आपल्या जागी दुसरीला पाही, डोळा तीच्या पाणी
जरी असल्या त्याच लाटा आणि तोच किनारा
आहे दर्यात आता दुसर्‍या होडीचा दरारा
दिवसाची रात्र होते आणि रात्रीचा दिवस
होडी माझी रमते आता आठवत जूने दिवस...

-मीरा पितळे