7 रेस्टॉरंट बारवर कारवाई

3.50 लक्ष इतक्या रक्कमेचा दंड वसूल 

नवी मुंबई ः विशेष दक्षता पथकांना कारवाईचे लक्ष्य देण्यात आल्याने त्यांच्यामार्फत होणार्‍या कारवाईला वेग आलेला असून 27 मार्चलाही बेलापूर, नेरूळ, सानपाडा, कोपरखैरणे भागत रात्री वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या 7 रेस्टॉरंट आणि बारकडून प्रत्येकी रू. 50 हजार प्रमाणे एकूण 3.50 लक्ष इतक्या रक्कमेचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कारवाईसाठी मुख्यालय स्तरावरून स्थापन करण्यात आलेल्या 31 दक्षता पथकांमधील 5 पथके ही रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर लक्ष ठेवून करावयाच्या कारवाईसाठी पोलीसांसह कार्यरत ठेवण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. या विशेष दक्षता पथकांना कारवाईचे लक्ष्य देण्यात आल्याने त्यांच्यामार्फत होणार्‍या कारवाईला वेग आलेला असून 27 मार्चलाही बेलापूर, नेरूळ, सानपाडा, कोपरखैरणे भागत रात्री वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या 7 रेस्टॉरंट आणि बारकडून प्रत्येकी रू. 50 हजार प्रमाणे एकूण 3.50 लक्ष इतक्या रक्कमेचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. यामध्ये, सेक्टर 8 नेरूळ येथील कल्पना बार, साई हॉटेल अँड बार, पोटोबा फास्ट फुड तसेच बेलापूर येथील रूड लंग बार, सानपाडा येथील कृष्णा रेस्टॉरंट ड बार तसेच कोपरखैरणे येथील क्लासिक रेस्टॉरंट अँड बार व समुद्र रेस्टॉरंट अँड बार अशा 7 आस्थापनांचा समावेश आहे. या सर्वांकडून प्रत्येकी 50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली असून विशेष दक्षता पथकांची सर्वच विभागांमध्ये कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात ठोस कारवाई सुरू आहे.