संजय देसाईंकडे शहर अभियंता पदाचा पदभार

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील हे 31 मार्च रोजी निवृत्त झाले. गेली साडे तीन वर्षे त्यांनी या पदाचा कारभार सांभाळला होता.  या पदाचा कारभार आपल्याला मिळावा म्हणून महापालिकेतील अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील आणि सिडकोतील कारी अधिकार्‍यांनी याबाबत फिल्डिंग लावली होती. 

शुक्रवारी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर अभियंता या पदाचा पदभार कार्यकारी अभियंता संजय देसाई यांच्याकडे सोपवला आहे. संजय देसाई पालिका स्थापनेपासून पालिकेच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत असून अनेक महत्वाचे प्रकल्प त्यांनी आपल्या कार्यकाळात पुर्ण केले आहेत. या पदाचा कारभार पालिकेतील अधिकार्‍याकडेच राहावा अशी अपेक्षा कर्मचारी युनियनने आयुक्तांकडे केली होती.