कोकण भवनात ब्रेक दि चेन अभियानाची अंमलबजावणी

नवी मुंबई : कोकण भवन प्रशासकीय इमारत व आजूबाजूच्या परिसरात कोरोना विषाणूचे संक्रमण व प्रादुर्भाव नियंत्रित करण्याकरिता विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शासनाच्या आदेशान्वये ‘ब्रेक दि चेन’  या अभियानाला सुरूवात केली आहे.  तसेच कोकण भवनातील कार्यालयांमध्ये कार्यरत असलेले सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी ‘ब्रेक दि चेन’ या अभियानातील सूचनांचे काटेकोर पालन कराण्याबाबत सूचना केल्या आहेत.

कोरोना बाधितांची दिवसेंदिवस वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात ‘ब्रेक दि चेन’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या अनुषंगाने राज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत खाजगी कार्यालयांना पूर्णपणे वर्क फ्रॉम होम’ करणे  बंधनकारक केले आहे. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शासकीय कार्यालयांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासकीय कार्यालय 50% उपस्थितीत सुरू राहतील, तर जी कार्यालये कोविड उपाययोजनासंदर्भात कामकाज करीत आहेत, ती कार्यालये 100 टक्के उपस्थितीने काम करतील.  कार्यालयातील बैठका ऑनलाईनद्वारे घ्यावयाच्या आहेत. शासकीय कार्यालयात अभ्यागताना प्रवेश नसेल. सर्व कार्यालयांनी शर्-ींळीळींेी सिस्टिम चालू करावी. अभ्यागतास अपवादात्मक परिस्थितीत प्रवेश घ्यावयाचा असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. यावेळी अभ्यागताकडे प्रवेश वेळेच्या 48 तासाच्या आतील  negative RTAPCR अहवाल असणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या निकषांप्रमाणे उपलब्धतेनुसार सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 

कोकण भवन प्रशासकीय इमारतीतील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी ‘ब्रेक दि चेन’ या अभियानातील सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.